Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

या' मुलींना मिळणार मोफत शिक्षण, राज्य सरकारने घेतला निर्णय

मुंबई- राज्य मंत्रिमंडळाची काल महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. आर्थिक दृष्या दुर्बल घटक, सामाजिक व शैक्षणिक दृष्या मागास प्रवर्ग आणि इतर मागास वर्गातील विद्यार्थीनींना व्यावसायिक आभ्यासक्रमासाठी 100 टक्के शुल्कमाफी करण्यात आली.

Students

सरकारच्या या निर्णयामुळे अनेक विद्यार्थीनींच्या शिक्षणाची समस्या सुटणार आहे. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी मुलींच्या मोफत शिक्षणाची घोषणा केली होती. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींची संख्या वाढावी, या उद्देशाने राज्य सरकारने याबाबतचा निर्णय घेतला होता. यानंतर राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय व्यावसायिक अभ्यासक्रमाचं शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी घेण्यात आला आहे.

व्यवसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस), सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग(एसईबीसी) तसेच इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के ऐवजी आता 100 टक्के शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती मंजूर करण्यात आली आहे. राज्य सरकारचा हा निर्णय म्हणजे EWS, SEBC आणि OBC विद्यार्थीनींच्या कुटुंबियांना मिळालेला मोठा दिला आहे.

मुलींना होणार फायदा

राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थींनीना मोठा फायदा होणार आहे. शिक्षण हा मुलींचा हक्क या निर्णयामुळे सुरळीत होणार आहे. या निर्णयामुळे व्यावसायिक आभ्यासक्रमाकडे मुलींचा कल वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+