48 तास उलटले तरी आरोपीचा सुगावा नाही, सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी अजित पवारांचं मोठ विधान
Saif Ali Khan Update: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांना अद्याप हल्लेखोराला अटक करण्यात यश मिळालेलं नाही. घटनेला 48 तास उलटूनही आरोपींचा कोणताही सुगावा लागलेला नाही. या घटनेवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवार म्हणाले की, या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे आणि आरोपी लवकरच पकडले जातील.
सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, "तुम्ही लोकांनी पूर्ण माहिती न घेता वेगवेगळ्या बातम्या चालवल्या. आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासत आहोत. आरोपी कुठे पळून गेला आहे की नाही, तो चोरीच्या उद्देशाने आला होता की, आणखी काही घडले आहे याचाही आम्ही शोध घेत आहोत. आमचे नेहमीच प्रयत्न असतात की देवेंद्र फडणवीस असोत किंवा मी, राज्याच्या प्रत्येक भागात कायदा आणि सुव्यवस्था चांगली राहावी."

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आश्वासन दिले की, पोलिस या प्रकरणाचा तपास जलदगतीने करत आहेत. लवकरच आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश मिळेल. पोलिसांनी म्हटलं आहे की, हल्लेखोराचे कृत्य व्यावसायिक गुन्हेगारासारखे वाटत नाही. आतापर्यंतच्या तपासात आरोपीची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आढळून आलेली नाही.तसेच त्याच्या कुटुंबाबद्दल किंवा मित्रांबद्दल कोणतीही माहिती गोळा करता आली नाही. पोलीस त्यांच्या पातळीवर आरोपींचा शोध घेत आहेत.
Saif Ali Khan Attack Case | Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawar says, "You people asked us about the attack on Saif Ali Khan, but you people ran different stories without getting complete information...CCTV is being checked. Now we are also looking into whether the… pic.twitter.com/0MdeNM8bvt
— ANI (@ANI) January 18, 2025
आरोपीच्या शोधासाठी 35 पोलिस पथक
मुंबई पोलिस आणि गुन्हे शाखेच्या एकूण 35 पथके आरोपींचा शोध घेत आहेत. पोलिसांनी मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांवर आणि एक्सप्रेस गाड्यांच्या थांब्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. आरोपी दुसऱ्या राज्यात गेला आहे का याचाही पोलीस शोध घेत आहेत.
दरम्यान 12 जानेवारी रोजी वर्सोवा परिसरात झालेल्या चोरीच्या प्रकरणातील आरोपी शाहिदचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. सैफ अली खानवरील हल्ल्याशी थेट संबंधित कोणतेही पुरावे सापडले नसले तरी पोलिसांनी शाहिदला क्लीन चिट दिलेली नाही. पोलीस आता वर्सोवा सोसायटी आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी करत आहेत.
सैफ-करीना कपूरच्या कर्मचाऱ्यांची चौकशी
मुंबई पोलिसांनी सैफ अली खान आणि करीना कपूर यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. तसेच त्यांच्या घरातील कर्मचा-यांचे जबाब नोंदवून चौकशी केली आहे. आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात 40-50 लोकांची चौकशी केली आहे, त्यापैकी बहुतेक जण सैफचे ओळखीचे असल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात सैफच्या कर्मचाऱ्यांपैकी कोणाचा सहभागी आहे का, याचाही तपास पोलिस करत आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण ?
16 जानेवारीच्या मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास एक अज्ञात व्यक्ती सैफ अली खानच्या घरात घुसला. सैफच्या घरातील महिला कर्मचाऱ्यांनी तिला पाहिले त्यावेळी काही गोंधळ निर्माण झाला. हा गोंधळाचा आवाज ऐकून सैफ अली खान बेडरुमच्या बाहेर आला. त्यावेळी त्या अज्ञात व्यक्तीशी झटापट झाली. यादरम्यान हल्लेखोराने सैफवर चाकूने सहा वार केले, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. सैफच्या मणक्याजवळही चाकूचा एक भाग अडकला होता. सैफवर मुंबईतील लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
-
गुढी कशी उभारावी? वाचा शास्त्रोक्त पूजा-विधी, शुभ मुहूर्त, मंत्र आणि आरती; करा नववर्षाचे स्वागत -
पुण्यासाठी मोठी बातमी! पुणेकरांचा प्रवास होणार सुसाट; रामवाडी-वाघोली मेट्रो कामाला गती; हा आहे फायदा -
युद्धाचा भडका! तरीही सोन्याच्या दरात मोठी घसरण! 10 ग्रॅमचा भाव झाला 'एवढा'; पहा मुंबई पुण्याचे दर -
सोन्याच्या दरात मोठी घसरण! दुबईत 10 तोळे सोने भारतापेक्षा 21 हजाराने स्वस्त; मुंबई, पुण्यातही स्वस्त -
हरीश राणांना कसा दिला जाणार 'इच्छामृत्यू'? व्हेंटीलेटर हटवणे ते अखेरच्या श्वासापर्यंत काय घडतं? वाचा -
काबुल हादरले! रुग्णालयावर भीषण 'एअरस्ट्राइक'; 400 जणांचा मृत्यू, 'त्या' व्हिडिओने जग सुन्न! -
Chaitra Amavasya 2026 :18 की 19 मार्च? चैत्र अमावस्या नक्की कधी? जाणून घ्या तिथी, शुभ-मुहूर्त, महत्व -
प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! महाराष्ट्रात 5 हजार पदांसाठी मेगाभरती; चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा -
आजचे राशीचक्र: कुणाचे नशीब चमकणार आणि कुणाला संघर्ष करावा लागणार? वाचा आजचे राशीभविष्य -
PF चे पैसे आता 3 दिवसांतच मिळणार! नोकरी बदलली तरी 'ऑटोमॅटिक ट्रान्सफर' होणार; नवे नियम वाचा -
Gudi Padwa 2026: गुढीपाडवा कधी आहे? का साजरा केला जातो हा सण? जाणून घ्या यामागील रंजक पौराणिक कथा -
LPG e-KYC Update : सर्व गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी गरजेची आहे का? पेट्रोलियम मंत्रालयाचा मोठा खुलासा








Click it and Unblock the Notifications