Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

महाराष्ट्र दिनानिमित्त आपल्या प्रियजनांना पाठवा खास मराठीत शुभेच्छा आणि हे फोटो

Maharashtra Din Wishes In Marathi : संपूर्ण राज्यात 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. हा दिवस महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस म्हणूनही साजरा केला जातो. 1960 साली महाराष्ट्र स्वतंत्र राज्य म्हणून स्थापन झाल्याचा हा दिवस आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या पराकोटीच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. या चळवळीत लोकनेते स्वातंत्र्यसैनिक आणि विचारवंतांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

1956 मध्ये झालेल्या राज्य पुनर्रचनेनंतर महाराष्ट्र आणि गुजरात हे दोन स्वतंत्र राज्ये बनले आणि त्याच दिवशी मुंबई महाराष्ट्राची राजधानी ठरली. हा दिवस महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला समर्पित आहे आणि दरवर्षी त्याचे औचित्य साजरे केले जाते. हा दिवस महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैविध्य आणि स्वातंत्र्याला अभिवादन करणारा आहे, त्यामुळे तो प्रत्येक मराठी माणसासाठी विशेष बनतो. या दिवशी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या जातात. या वर्षी महाराष्ट्राच्या दिनानिमित्त तुम्ही तुमच्या प्रियजनांना मराठीमध्ये शुभेच्छा संदेश पाठवून महाराष्ट्राच्या दिनाच्या खास शुभेच्छा देऊ शकता.

महाराष्ट्र दिनानिमित्त खास आपल्यासाठी शुभेच्छा संदेश

Maharashtra Day 2025

महाराष्ट्र दिनाच्या आपणास
हार्दिक शुभेच्छा...!

maharashtra day 2025

जय जय महाराष्ट्र माझा..
गर्जा महाराष्ट्र माझा..
महाराष्ट्र दिन आणि कामगार
दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

maharashtra day 2025

महाराष्ट्राची यशो गाथा
महाराष्ट्राची शौर्य कथा
पवित्र माती लावू कपाळी
धरणी मातेच्या चरणी माथा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!

maharashtra day 2025

जन्मलो ज्या मातीस
ती माती मराठी...
गुणगुणलो जे गीत
गीत मराठी...
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!

maharashtra day 2025

सह्याद्रीचा सिंह गर्जतो
शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला
महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!

maharashtra day 2025

दगड होईन तर सह्याद्रीचा
माती झालो तर महाराष्ट्राची
तलवार झालो तर आई भवानीची होईन
जय भवानी जय शिवाजी
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ...!

maharashtra day 2025

मराठी भाषा, मराठी मन
अभिमान महाराष्ट्राचा, स्वाभिमान मराठीचा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

maharashtra day 2025

मंगल देशा
पवित्र देशा
महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा
माझा हा महाराष्ट्र देशा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ...!

maharashtra day 2025

ज्ञानाच्या देशा,
प्रगतीच्या देशा आणि संताच्या देशा,
महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा...!

maharashtra day 2025

पुर्नजन्म घेतला तरी महाराष्ट्रात घेईन
आणि या मातीत जन्मलेल्या
वीरांसारखा शूरवीर होईन...
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!

maharashtra day 2025

महाराष्ट्रदिन चिरायु होवो
सर्वांना मनापासून
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!

maharashtra day 2025

भावभक्तीच्या देशा
आणिक बुद्धीच्या देशा
शाहिरांच्या देशा
कर्त्यां मर्दांच्या देशा...
जय जय महाराष्ट्र देशा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!

maharashtra day 2025

बहु असोत सुंदर संपन्न की महा...
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा....
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!

maharashtra day 2025

शिव निष्ठा येथे असे सतत जागती...
अग्रेसर प्रांत महाराष्ट्र भारती...
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!

maharashtra day 2025

अभिमान आहे मराठी असल्याचा
माझ्या मातीचा माझ्या महाराष्ट्राचा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ...!

maharashtra day 2025

कपाळी लावूनी केशरी टिळा
नमन करितो तुला
महाराष्ट्र देशा जय महाराष्ट्र
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ...!

maharashtra day 2025

ढोल ताश्याच्या गजरात
व्हावा उत्सव
उत्सव महाराष्ट्राचा
उत्सव माझ्या माय मराठीचा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!

maharashtra day 2025

"शौर्य, ज्ञान, बंधुता आणि समानता
असे अष्टपैलू घेऊन जगणारे
आणि जगवणारे माझे महान असे राष्ट्र महाराष्ट्र...
महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा...!

maharashtra day 2025

महान संतांची जन्मभूमि
विज्ञानाने जेथे केली प्रगती
प्रेम,आदर, स्नेह आणि माणुसकी
हीच आहे आमची संस्कृती.
महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा...!

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+