Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

महाराष्ट्र हादरला! स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या युवतीवर प्रशिक्षणार्थी PSI कडून बलात्कार!

महाराष्ट्राला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर शहरात उघडकीस आली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणीवर त्याच क्षेत्रातील एका प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकाने (PSI) लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. आरोपीने पीडितेचे खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत जबरदस्तीने गर्भपात घडवून आणल्याचेही समोर आले आहे.

Maharashtra crime

नेमके प्रकरण काय घडले?

पीडित तरुणी आणि आरोपी भागवत ज्ञानोबा मुलगीर हे दोघेही मूळचे परभणी जिल्ह्यातील रहिवासी आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरात ते स्पर्धा परीक्षांची तयारी करत होते. एकाच जिल्ह्यातून आल्यामुळे त्यांची ओळख झाली आणि हळूहळू या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले.

पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपी भागवत मुलगीर याने फेब्रुवारी २०२४ मध्ये तिला शहरातील अजबनगर परिसरातील एमएच-२० (MH-20) नावाच्या कॅफेत नेले. तिथे तिच्यावर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणून अत्याचार केला.

गर्भधारणा आणि जबरदस्ती गर्भपात

या संबंधातून पीडित तरुणी गर्भवती राहिली. ही बाब समोर आल्यानंतर आरोपीने अत्यंत गंभीर पाऊल उचलले. त्याने पीडितेला तिचे व त्याचे खाजगी फोटो व्हायरल करण्याची भीती दाखवली आणि तिला जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्या घेण्यास भाग पाडले. गोळ्यांमुळे गर्भपात झाल्यानंतर आरोपीने पीडितेपासून पूर्णपणे फारकत घेतली आणि तिला सर्वत्र ब्लॉक केले. याच दरम्यान आरोपी भागवत मुलगीर हा PSI पदाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला.

कुटुंबाकडूनही धमकावणे

आरोपी मुलगीरने संबंध तोडल्यानंतर पीडित महिलेने त्याच्या वडिलांशी आणि बहिणीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीच्या कुटुंबीयांनीही तिला सहानुभूती देण्याऐवजी "तुला जे करायचे ते कर" असे धमकावल्याचा आरोप पीडितेने केला आहे. मानसिक छळ, धमकी आणि झालेल्या अत्याचाराला कंटाळून पीडितेने अखेर क्रांती चौक पोलीस ठाण्यात धाव घेतली.

PSI सह कुटुंबीयांवर गुन्हा दाखल

पीडित महिलेच्या फिर्यादीवरून क्रांती चौक पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी प्रशिक्षणार्थी PSI भागवत ज्ञानोबा मुलगीर याच्याविरुद्ध बलात्कार आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. विशेष म्हणजे, पीडितेला धमकावल्याप्रकरणी आरोपीचे वडील आणि बहीण यांच्यावरही सहआरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त सागर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कॅफेच्या घटनास्थळाचा पंचनामा केला. सध्या आरोपी PSI आणि त्याचे कुटुंबीय फरार असून, पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+