महाराष्ट्रात सस्पेंस कायम! एकनाथ शिंदे दिल्लीतून परतले, उपमुख्यमंत्रीपद मुलाला देण्याबाबत आग्रही!
Maharashtra CM post Suspense : महाराष्ट्रातील महायुतीच्या नेत्यांची दिल्ली वारी झाल्यानंतरही नवा मुख्यमंत्री कोण? हा सस्पेंस कायम आहे. काल रात्री काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर महत्वाचे नेते दिल्लीत केंद्रीय गृहमंत्र्यांच्या घरी गेले होते, तिथे महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली. गुरुवारी रात्री उशिरा सुरू झालेल्या बैठकीला महायुतीचे तीन नेते एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी हजेरी लावली.
या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद आणि भावी मंत्रिमंडळाबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या महत्त्वाच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आलेले एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील लाडक्या बहिणींच्या योजनेसंदर्भा संदर्भ देत एक महत्वाचे वक्तव्य केले.

मुलासाठी शिंदे आग्रही
'एबीपी माझा' च्या वृत्तानुसार, भाजपकडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद सोडण्याच्या मोबदल्यात केंद्रात महत्त्वाच्या खात्याचे मंत्रीपद किंवा राज्यात उपमुख्यमंत्रीपद देण्याची ऑफर दिली होती. मात्र, एकनाथ शिंदे यांनी या दोन्ही ऑफर्स नाकारल्या आहेत. त्याऐवजी एकनाथ शिंदे यांनी एक नवा प्रस्ताव भाजपसमोर ठेवला आहे. राज्यातील विधानसभा निवडणूक ही माझ्या नेतृत्त्वाखाली लढवण्यात आली होती म्हणून मला राज्यात मुख्यमंत्रीपद मिळणार नसेल तर मला महायुती सरकारचा संयोजक हे पद द्यावे यासह मुलगा आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना राज्यात उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावे, अशी मागणी एकनाथ शिंदे यांची असल्याचे पुढे आले आहे.
'लाडका भाऊ' माझ्यासाठी कोणत्याही पदापेक्षा मोठा
दिल्लीत अमित शहांना भेटायला आलेले एकनाथ शिंदे म्हणाले, 'लाडका भाऊ' माझ्यासाठी कोणत्याही पदापेक्षा मोठा आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की, "महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाबाबत कोणताही अडथळा नसल्याची माझी भूमिका मी काल पत्रकार परिषदेत स्पष्ट केली आहे. यासोबतच ते म्हणाले की, आता लाडका भाऊ दिल्लीत आला आहे, हे पद माझ्यासाटी कोणत्याही पदासाठी मोठे आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री जे काही निर्णय घेतील, त्याबद्दल त्यांना मान्य राहील, असे शिंदे यांनी पत्रकार परिषदेत यापुर्वीच सांगितले होते. आता यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर आहे.
दिल्लीच्या बैठकीत काय झाले?
गुरुवारी दिल्लीत अमित शहा यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यासंदर्भात चर्चा झाली.यात एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एनसीपी नेते सुनील तटकरे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे देखील उपस्थित होते. अमित शहा यांच्या घरी महायुतीची दोन तास बैठक झाली आणि प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, शहा यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक सुरू होती. तासभर चाललेल्या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाबाबत निर्णय झाला. फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे.












Click it and Unblock the Notifications