Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Maharashtra cabinet : घरकुलासाठी 5 ब्रास वाळू फ्री मिळणार; वाचा- मंत्रिमंडळाच्या बैठकीतील 9 निर्णय

Maharashtra Cabinet Decision : महाराष्ट्र सरकारच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक दर मंगळवारी पार पडते. त्याप्रमाणे आज दि.8 रोजी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे नऊ निर्णय घेण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने एम सँड म्हणजे कृत्रिम वाळूबाबत धोरण आणण्यात मोठी चर्चा झाली आहे. यासंदर्भात राज्याचे महसूलमंत्री तथा भाजप नेते चंद्रशेखरल बावनकुळे यांनी दिली. चला तर बैठकीत कोणते मोठे निर्णय झाले आणि कोणत्या विषयावर सखोल चर्चा झाली याबाबत जाणून घेऊया... !

वाळूची जुनी डेपो पद्धत बंद केली जाणार

मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने वाळूबाबत सध्या अस्तित्वात असलेली जुनी डेपो पद्धती बंद करण्याचा निर्णय झाला आहे. त्या ठिकाणची वाळू संपल्यानंतर तो डेपो बंद करण्यात येईल. यापुढे आता नदी विभागासाठी दोन वर्षांसाठी आणि खाडी पात्रासाठी तीन वर्षांसाठी लिलाव पद्धतीने वाळू उपसा दिला जाणार आहे. जलसिंचनाच्या मोठे प्रकल्पामध्ये असलेली वाळू उपसा करण्यात येईल आणि धरणांची क्षमता वाढवली जाणार आहे. परराज्यातून येणाऱ्या वाळूवर सध्या झीरो रॉयल्टी दिली जाते. त्यावरही चर्चा या बैठकीत झालेली आहे, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Maharashtra Cabinet Meeting

घरकुलासाठी मिळणार वाळू मोफत

मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज दुसरा आणि अतिशय महत्त्वाचाव जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने घरकुलांसाठी ५ ब्रास वाळू मोफत दिली जाणार आहे. जनतेची जेवढी मागणी आहे तेवढी वाळू उपलब्ध करण्यात येणार आहे.

कृत्रिम वाळू निर्मितीवर दिला जाणार भर

राज्यात यापुढे एम सँड धोरण आखण्यात येणार आहे. पुढच्या मंत्रिमंडळामध्ये त्यावर चर्चा करण्यात येणार आहे. त्यानुसार येत्या तीन वर्षांमध्ये राज्यातील सर्व सरकारी, सार्वजनिक बांधकामं असतील त्या ठिकाणी कृत्रिम वाळू वापरण्यात येणार आहे. यापुढे सरकारी बांधकामासाठी नदी पात्रातील वाळू वापरण्यात येणार नाही. कृत्रिम वाळू निर्मितीसाठी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये 50 एम सँड क्रशर निर्मित करण्यात येणार आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय..!

1) नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर व पुणे या महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांच्या हद्दीतील शासकीय जमिनी संबंधित प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करणार, यातून विकास कामांना वेग येणार (नगर विकास).

2) राज्याचे वाळू- रेती निर्गती धोरण-2025 जाहीर (महसूल).

3) महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (सुधारणा निर्मुलन व पुनर्वसन) अधिनियम-1971 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय; झोपडपट्टी पुनर्वसनाला गती मिळणार (गृहनिर्माण).

4) वांद्रे रिक्लेमेशन व आदर्श नगर (वरळी) या दोन म्हाडा अभिन्यासातील इमारतींचा C&DA मार्फत एकत्रित पुनर्विकास करण्याचा निर्णय (गृहनिर्माण).

5) सिंधी विस्थापितांचे पट्टे नियमित करण्यासाठी धोरण विशेष अभय योजना-2025 (महसूल).

6) नागपूर येथे राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेची स्थापना करण्यात येणार (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन).

7) खाजगी अनुदानित आयुर्वेद व खाजगी अनुदानित युनानी संस्थांमधील गट-ब, क व ड संवर्गातील शासन मंजूर पदावरील शिक्षकेत्तर अधिकारी व कर्मचारी यांना पूर्वलक्षी प्रभावाने एक व दोन लाभांची 'सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना' लागू करण्याचा निर्णय (वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये).

8) शासकीय आयुर्वेद / होमिओपॅथी / युनानी / योग व निसर्गोपचार महाविद्यालयांतील कंत्राटी पध्दतीने मानधन तत्वावर भरावयाच्या अध्यापकांचे दरमहा एकत्रित ठोक मानधन निश्चित (वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये).

9) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमात सुधारणा (ग्रामविकास).

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+