Maharashtra Cabinet Expansion : फडणवीस सरकारमध्ये 33 कॅबिनेट, 6 राज्यमंत्र्यांनी घेतली शपथ
Maharashtra Cabinet Expansion : महाराष्ट्रात महायुतीच्या ऐतिहासिक विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांनी तिस-यादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन नेत्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी पाच डिसेंबरला मुंबईत पार पडला. त्यानंतर आता अकरा दिवसांनी मंत्रीमंडळ विस्तार होत आहे.
आज नागपुरात महायुतीच्या 39 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आज सकाळी भाजपने त्यांच्या संभाव्य मंत्र्यांना कॉल केल्यानंतर आता एकनाथ शिंदे, अजित पवारांच्या पक्षांकडून मंत्रीपदासाठी कॉल्स केले होते. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या निर्णयानंतर आता हे कॉल पक्षांमार्फत संभाव्य मंत्र्यांना केले गेले. या नेत्यांना कॉल करुन मंत्रिपदासाठी निमंत्रित केले जात आहे.

दरम्यान, महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा फार्म्युला ठरला असून मंत्रिमंडळात भाजपचे 21 शिवसेनेचे 12 तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) 10 मंत्र्यांचा समावेश आहे. अर्थातच 288 सदस्यसंख्या असल्याने 43 मंत्री महाराष्ट्राला मिळाले आहेत. त्यापैकी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे.












Click it and Unblock the Notifications