Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भाजपची नवी टीम सज्ज! रवींद्र चव्हाणांकडून प्रदेश पदाधिकाऱ्यांची घोषणा; वाचा कुणाला कोणतं पदं मिळालं

Maharashtra bjp new office bearers list 2026 : गेल्या अनेक महिन्यांपासून बहुप्रतिक्षित असलेल्या महाराष्ट्र भाजपच्या नव्या प्रदेश कार्यकारिणीची अखेर घोषणा करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी आज, मंगळवार २४ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईतील पत्रकार परिषदेत राज्यातील नव्या पदाधिकाऱ्यांच्या नावांची अधिकृत घोषणा केली. यामध्ये अनुभवी नेत्यांसोबतच नव्या चेहऱ्यांना आणि निष्ठावंतांना संधी देण्यात आली आहे.

Maharashtra bjp new office bearers list 2026

पत्रकार परिषदेतील मुख्य मुद्दे

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले, "काही महिन्यांपूर्वी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने माझ्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. त्यानंतर आलेल्या निवडणुका आणि आचारसंहितेमुळे कार्यकारिणी जाहीर करण्यास थोडा विलंब झाला. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबिन आणि इतर वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून सक्षम कार्यकर्त्यांची ही टीम तयार करण्यात आली आहे. मर्यादित संधी असूनही पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे योगदान महत्त्वाचे आहे."

भाजपच्या नव्या पदाधिकाऱ्यांची संपूर्ण यादी

मुख्य प्रवक्ते आणि उपाध्यक्ष

  • मुख्य प्रवक्ता: नवनाथ बन
  • प्रदेश उपाध्यक्ष: अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोरगे, संजय भेंडे, रामदास कडस, केशव उपाध्ये, गोपीचंद पडळकर, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील, अर्चना पाटील चाकूरकर.
  • सरचिटणीस आणि चिटणीस
  • सरचिटणीस: निरंजन डावखरे, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश पांडे, सुनील राणे, योगेश सागर.
  • चिटणीस: मंगेश चव्हाण, संजय कुटे, परिणय फुके, वर्षा डहाळे, संजय जगताप, अर्चना डेहणकर, रोहिणी नायडू, राम सातपुते, प्रविण घुगे, रेखा कुलकर्णी, भैरवी घाक.
  • मोर्चा आणि आघाडी अध्यक्ष
  • भाजप युवा मोर्चा अध्यक्ष: कृष्णराज महाडिक
  • भाजप महिला मोर्चा अध्यक्ष: चित्रा वाघ
  • भाजप ओबीसी मोर्चा अध्यक्ष: योगेश टिळेकर
  • महत्त्वाची पदे
  • कोषाध्यक्ष: मिहिर कोटेचा

२०२९ च्या निवडणुकांची तयारी

रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले की, ही नवी टीम केवळ पक्षाची संघटनात्मक बांधणीच करणार नाही, तर आगामी २०२९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी आतापासूनच रणनीती आखणार आहे. जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांचा मेळ घालून 'गाव-वस्ती संपर्क अभियान' अधिक प्रभावीपणे राबवण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+