राहुल नार्वेकर दुसऱ्यांदा होणार विधानसभेचे अध्यक्ष; वाचा, आज विधानसभेत नेमकं काय घडलं...

Maharashtra Assembly Speaker Election- विधानसभा अध्यक्षपदी आता राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड होणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. दुपारी बारा वाजेपर्यंत दिलेल्या मुदतीत फक्त भाजपच्या राहुल नार्वेकरांचा एकमेव अर्ज आल्याने, ही निवड बिनविरोध होणार हे आता स्पष्ट झाले आहे.

Rahul Narvekar

सलग दुसऱ्यांदा होणार अध्यक्ष

उद्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार आहे. या पदासाठी राहूल नार्वेकरांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांच्याच नावाची उद्या घोषणा होणार आहे. अडीच वर्षांपूर्वी महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी भाजपबरोबर सरकार स्थापन केले होते. यावेळी विधानसभा अध्यक्षपद हे भाजपकडेच होतं. भाजपनं ही जबाबदारी त्यावेळी आमदार राहुल नार्वेकर यांच्याकडे दिली होती. आता दुसऱ्यांदा राहुल नार्वेकर यांच्याकडे विधानसभेचं अध्यक्षपद जाणार आहे. राहुल नार्वेकर हे कुलाबा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडून आले आहे. नार्वेकर सलग दुसऱ्यांदा या मतदारसंघातून विजयी झाले आहेत.

महायुतीला मिळाले आहे बहुमत

महाराष्ट्र विधानसभेसाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळवलं आहे. या निवडणुकीत भाजपला 132, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 57 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागांवर विजय मिळाला. मित्रपक्षांसह महायुतीचे संख्याबळ सध्या 236 आहे. या यशानंतर मुख्यमंत्री भाजपचाच झाला. आता विधानसभा अध्यक्षपद पुन्हा एकदा भाजपने आपल्याकडेच ठेवलं आहे. भाजपकडून विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांना पुन्हा संधी मिळणार हे निश्चित झालं आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+