धक्कादायक! मनसेची पक्ष मान्यता रद्द होणार..? चिन्हही जाणार..? काय सांगतो निवडणूक आयोगाचा नियम
The threat of MNS increased- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी लागला. त्यात अनेक दिग्गजांना पराभवाला सामोरं जावं लागलं. या निवडणुकीत मनसेनंही आपले उमेदवार उभे केले होते. त्यांच्यामुळे अनेक ठिकाणी तिरंगी लढत होत, रंगत आली. मात्र या निवडणुकीत मनसेला भोपळाही फोडता आला नाही. या निच्चांकी कामगिरीचा परिणाम त्यांना आता भोगावा लागेल, अशी शक्यता आहे. मनसेची पक्षमान्यता व चिन्ह जाण्याचा धोका यामुळे वाढला आहे.

काय सांगतो निवडणूक आयोगाचा नियम
निवडणूक आयोगाचे पक्ष मान्यतेसाठी काही नियम असतात. ते सर्वांसाठी सारखेच असतात. या नियमांची माहिती विधानसभेचे माजी सचिव अनंत कळसे यांनी दिली. एका कार्यक्रमात बोलतान ते म्हणाले की, "एखाद्या पक्षाची मान्यता कशीकायम राहते याचे तीन पर्याय असतात. पहिला पर्याय म्हणजे आमदार निवडून आला किंवा एकूण मतदानांच्या 8 टक्के मतं मिळाली तर ती राहते. दुसरा नियम म्हणजे आमदार किंवा एकूण मतदानाच्या 6 टक्के मतं असली तरी ती राहते. तिसरा पर्याय म्हणजे आमदार निवडून आला किंवा एकूण मतदानाच्या 3 टक्के मते मिळाली तरी ती कायम राहू शकते.
का वाढलाय मनसेला धोका?
पक्षाची मान्यता कायम ठेवण्यासाठी वरील तीनपैकी एक अट पूर्ण करावी लागते. मात्र या निवडणुकीत मनसेला केवळ 1.8 टक्के मते मिळाली आहेत. त्यामुळे मनसेची मान्यता रद्द होऊ शकते का? अशा चर्चा आता सुरु झाल्या आहेत. असे झाले तर त्यांच्या पक्षाचे रेल्वेइंजिन हे चिन्हही जाण्याची शक्यता आहे. याबाबत बोलताना कळसे म्हणाले की, "निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे. ते निर्णय घेवू शकतात. निवडणूक आयोगाकडून संबंधित पक्षांना नोटीस पाठवली जाते. निवडणूक आयोग त्यांना नोटीस पाठवून मान्यता रद्द करू शकतं. सध्याच्या घडीला मनसेकडे दुसरा कुठलाही पर्याय दिसत नाही", असही कळसे यांनी स्पष्ट केलं.
मनसेची मान्यता रद्द झाली तर काय?
मनसेची पक्ष म्हणून मान्यता कायम ठेवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. मात्र त्यांची मान्यता रद्द झाली तर, मनसेला रेल्वे इंजिन हे चिन्ह मिळणार नाही. निवडणुकीतील मान्यता रद्द झाल्यानंतर जे चिन्ह फ्री असतं, ते घ्यावं लागतं, हा नियम आहे. कायद्याप्रमाणे ते रेल्वेइंजिन या चिन्हावर दावा करू शकत नाहीत. त्यामुळे निवडणूक आयोग आता याबाबत काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.












Click it and Unblock the Notifications