एकनाथ शिंदेंना बाल्लेकिल्ल्यात 20% मतांची वाढ, भरघोस पाठिंबा
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील दरे या गावचे. पण त्यांच्या जडणघडणीत ठाणे या शहराचा खूप मोठा वाटा आहे. एकनाथ शिंदे यांचे कुटुंब रोजीरोटीसाठी ठाण्यात आले. एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीच्या काळात रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला.
रिक्षा चालक ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हा प्रचंड मोठा प्रवास एकनाथ शिंदे नावाच्या एका ग्रामीण भागातील तरुणांने केला असला तरी आजही शिंदे यांचे आपल्या मूळ गावाशी ऋणानुबंध कायम आहेत. आपल्या फावल्या वेळात ते आपल्या गावाला जातात आणि आपल्या शेतीवाडीत तसेच गाई आणि गुरांबरोबर वेळ घालवत असतात. दरे या गावाला नुकतीच त्यांनी भेट दिली आणि आपल्या आईच्या ओळखीच्या वृद्ध महिलांशी चर्चा केली.

ठाणे आणि शिंदे यांचे घट्ट नाते
ठाणे आणि एकनाथ शिंदे यांचे घट्ट असे नाते आहे.रिक्षा चालक असलेले एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे ठाण्याचे माजी जिल्हाप्रमुख आणि फायर ब्रँड हिंदुत्ववादी नेते आनंद दिघे यांच्या संपर्कात आले. आनंद दिघे नावाच्या परिसाच्या स्पर्शाने एकनाथ शिंदे यांच्या आयुष्याचे सोने झाले,असे म्हणायला हरकत नाही.आनंद दिघे यांच्या संपर्कात आल्यानंतर एकनाथ शिंदे शिवसेनेत सहभागी झाले. साधा शिवसैनिक,शाखाप्रमुख,नगरसेवक,पक्षाचा गटनेता अशी असंख्य पदे एकनाथ शिंदे यांनी भूषवली.
कामगारांचा आणि कष्टकऱ्यांचा नेता अशी त्यांची ओळख निर्माण झाली. ठाण्यात बेसुमार वाढलेल्या डान्सबार विरोधात त्यांनी केलेले आंदोलन विशेष गाजले. बेळगावच्या सीमालढ्यात एकनाथ शिंदे यांनी अनेक दिवसांचा कारावास देखील भोगला. आनंद दिघे यांचे पट्ट शिष्य म्हणून त्यांना स्थान मिळाले. 1997 साली ते पहिल्यांदा नगरसेवक झाले. 2001 साली आनंद दिघे यांचे अपघाती निधन झाले आणि दिघे यांचा वारसा एकनाथ शिंदे यांच्याकडे चालून आला. आणि जिल्हाप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांनी ठाणे तसेच पालघर जिल्ह्यात पक्षाची मजबूत बांधणी केली.
विधानसभेतील पहिला विजय
कोपरी, पाचपाखाडी, वागळे इस्टेट हा प्रेरणा शिंदे यांचा बालेकिल्ला बनला. 2004 साली पहिल्यांदा एकनाथ शिंदे यांना पूर्वीच्या ठाणे विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि पहिल्याच निवडणुकीत एक लाख 31 हजार मते घेऊन ते विजयी झाले त्यांच्या विरोधात असलेले काँग्रेसचे मनोज शिंदे यांना 93 हजार मते मिळाली होती उर्वरित उमेदवारांचे डिपॉझिट देखील जप्त झाले होते. 2004 साली विधानसभा निवडणुकीत वयाच्या अवघ्या 41 व्या वर्षी विजयी झालेले एकनाथ शिंदे यांनी नंतर मागे वळून पाहिलेच नाही. ठाणे आणि विशेषतः कोपरीच्या नागरिकांच्या प्रचंड पाठिंब्याने त्यांची राजकीय घोडदौड सुरू झाली. जी आजतागायत कायम आहे.
कोपरी पाचपाखाडीमधील वाटचाल
2009 साली राज्यात मतदार संघाची पुनर्रचना झाली आणि एकनाथ शिंदे यांनी कोपरी पाचपाखाडी या नव्याने निर्माण झालेल्या विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्या वेळी निवडणूक लढवली.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तेव्हा प्रचंड क्रेझ होती. सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांनी दीड दीड लाख मते घेतली होती. मुंबई आणि परिसरात शिवसेनेचा सुपडा साफ झाला होता. विधानसभा निवडणुकीतही मनसे आपला चमत्कार दाखवील अशी शक्यता निर्माण झाली होती परंतु एकनाथ शिंदे यांनी आपल्या विरोधकावर सहज मात केली. एकनाथ शिंदे यांना 73 हजार, काँग्रेसचे मनोज शिंदे यांना 40000 तर मनसेचे राजन गावंड यांना 35 हजार 914 मते मिळाली. एकनाथ शिंदे यांना मिळालेल्या मतांची टक्केवारी जवळपास 45 टक्के इतकी होती. 2009 साली सुद्धा शिंदे यांना विरोधी बाकांवर बसावे लागले.
वाढती लोकप्रियता
कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत गेली आणि त्या लोकप्रियतेप्रमाणेच त्यांना मिळणारी मते देखील वाढत गेली.2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप हे युतीतील दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले. नरेंद्र मोदी यांची जबरदस्त लाट तेव्हा महाराष्ट्रात देखील निर्माण झाली होती. तरीही एकनाथ शिंदे यांना एक लाख तर भाजपचे डॉक्टर संदीप लेले यांना 49 हजार 447 एवढी मते मिळाली.
काँग्रेसचे मनोज गोस्वामी यांना 17000 तर मनसेचे सेजल तेजम यांना 8500 मते मिळाली राष्ट्रवादीच्या बीपीन महाले यांना तीन हजार मते मिळाली. यावेळी शिंदे यांना मिळालेल्या मतांची टक्केवारी 54 टक्के इतकी होती. 2014 साली सुरुवातीला शिवसेनेने विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय घेतला तेव्हा एकनाथ शिंदे यांची विरोधी पक्ष नेते म्हणून निवड करण्यात आली. पण नंतर शिवसेना भाजपबरोबर सत्तेत सहभागी झाली. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होतील, अशी अटकळ तेव्हा बांधण्यात येत होती पण त्यांना सार्वजनिक बांधकाम विभाग ( सार्वजनिक उपक्रम वगळून) हे खाते देण्यात आले. हे खाते सांभाळत असताना त्यांनी समृद्धी महामार्गासारखा प्रचंड मोठा पायाभूत सुविधा प्रकल्प निर्माण करून महाराष्ट्राचा चेहरा मोहरा सपशेल बदलून टाकला.
सलग चौथा विजय
2019 साली देखील कोपरी पाचपाखाडी मतदार संघात शिंदे यांची लोकप्रियता पूर्वीप्रमाणेच कायम राहिली आणि त्यांनी एक लाख 13 हजार मते घेत काँग्रेसचे संजय घाडीगावकर यांचा पराभव केला. तर मनसेचे महेश कदम यांना 21513 मते मिळाली. शिंदे यांना 2019 साली मिळालेल्या मतांची टक्केवारी तब्बल 65 टक्के इतकी होती. म्हणजेच सलग तीन निवडणुका एकनाथ शिंदे यांना मिळणाऱ्या मतदानात 20 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.2019 साली एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद मिळेल अशी आशा होती. पण उद्धव ठाकरे आयत्यावेळी मुख्यमंत्री झाले आणि एकनाथ शिंदे यांना नगर विकास मंत्री पदावर समाधान मानावे लागले. पण दोनच वर्षात बंडाचा झेंडा उभारून त्यांनी मुख्यमंत्री पद मिळवले आणि शिवसेनेच्या चाळीस आमदारांनी त्यांना पूर्ण पाठिंबा दिला.
मतदारांचा विश्वास कायम
ठाकरेंचे नेतृत्व झुगारून देणाऱ्या कोणत्याही नेत्याला सुरुवातीला प्रचंड विरोधाचा सामना करावा लागतो. शिवसेनेतून बाहेर गेलेल्या बहुतेक नेत्यांना याचा चांगलाच अनुभव आहे. छगन भुजबळ यांना तर अनेक दिवस लपून-छपून फिरावे लागत होते. पण एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर कोपरी पाचपाखाडी मधील मतदारांनी चांगलाच विश्वास दाखवला. त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी झाली. ठाण्यातून नरेश म्हस्के लोकसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजयी झाले. ठाण्याचे अनेक नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सहभागी झाले. आणि मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांनी सलग दोन वर्षे पूर्ण केली.
-
Papmochani ekadashi 2026 wishes marathi पापमोचनी एकादशीनिमित्त प्रियजनांना पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश -
आजचे राशीभविष्य: सोमवार १६ मार्च २०२६, 'या' राशींना होणार प्रचंड धनलाभ; पाहा तुमची रास! -
LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी! गॅस सप्लाय बंद होण्याची भीती वाटतेय? घरबसल्या करा e-KYC 'ही' सोपी पद्धत -
पुण्यासाठी मोठी बातमी! पुणेकरांचा प्रवास होणार सुसाट; रामवाडी-वाघोली मेट्रो कामाला गती; हा आहे फायदा -
Eid ul fitr 2026 wishes marathi hindi: इदनिमित्त खास मराठी-हिंदी 20 शुभेच्छा संदेश वाचा आणि शेअर करा -
आजचे राशिभविष्य 15 मार्च 2026 : 'या' राशींच्या नशिबात राजयोग! कोणाला मिळणार पैसा आणि कोणाला यश? वाचा -
सोन्याच्या दरात मोठी घसरण! दुबईत 10 तोळे सोने भारतापेक्षा 21 हजाराने स्वस्त; मुंबई, पुण्यातही स्वस्त -
IPL 2026 : मैदानावरचा शेवटचा 'हेलिकॉप्टर शॉट'? आयपीएलनंतर धोनीसह 'हे' 5 दिग्गज घेणार निवृत्ती -
Rajya Sabha Election 2026 Result : राज्यसभेच्या 37 जागांचा निकाल; पाहा विजेत्यांची यादी -
अदानी टोटल गॅसकडून औद्योगिक ग्राहकांसाठी अतिरिक्त नैसर्गिक वायूच्या दरात कपात -
इराण-इस्त्रायल युद्धावर RSSने मांडली भूमिका; सरकार्यवाह होसबळे यांनी मोदी सरकारचे केले समर्थन! -
Baramati Bypoll 2026 : सुनेत्रा पवार रिंगणात, पण 'बिनविरोध'ची शक्यता धूसर? जाणून घ्या नेमकं समीकरण










Click it and Unblock the Notifications