भायखळ्याच्या रणरागिणीला पुन्हा विजयाची संधी
शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यात मुंबई शहरातील भायखळा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार यामिनी यशवंत जाधव यांना उमेदवारी दिली आहे. आक्रमक, अभ्यासू आणि मुद्देसूद मांडणी करणारी लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख आहे. गेल्या पाच वर्षात त्यांनी भायखळा विधानसभा मतदारसंघात आपल्या कामाने आणि आपल्या वक्तृत्वाने स्वतःची अशी प्रतिमा निर्माण केली आहे.
शिवसेनेचे उपनेते आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पत्नी म्हणजे यामिनी यशवंत जाधव. यशवंत जाधव हे 1997 साली मुंबई महानगरपालिकेवर पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून गेले त्यानंतर 2007 साली त्यांना पुन्हा नगरसेवक पदाची संधी मिळाली.2012 साली यामिनी यशवंत जाधव या पहिल्यांदाच महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात आल्या आणि त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली.2012 साली त्या पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात माजगाव परिसरातून निवडून गेल्या आणि त्यांनी आपल्या कामाची आणि अभ्यासूपणाची झलक सभागृहाला दाखवली.

बेबी फीडिंग सेंटर कार्यान्वित
सार्वजनिक ठिकाणी स्तनदा मातांना होणारी अडचण लक्षात घेऊन त्यांनी बेबी फीडिंग सेंटर सुरू करून घेतले.वैयक्तिक लाभाच्या योजना मुंबई शहरात सर्वच प्रभागातील लाभार्थींना पोहोचल्या पाहिजेत यासाठी त्यांनी आग्रह धरला. मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पावर केलेले प्रदीर्घ भाषण त्यांच्या कारकीर्दीचे वैशिष्ट्य ठरले. मुंबई महानगरपालिकेने घेतलेल्या अनेक धोरणात्मक निर्णयात यामिनी यशवंत जाधव यांचे अमूल्य योगदान आहे. 2017 साली झालेल्या महानगरपालिकेची निवडणुकीत त्या पराभूत झाल्या परंतु 2019 साली त्यांना भायखळा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेने आमदारकीचे तिकीट दिले.
2004 सालापासून भायखळा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला हुलकावणी देत होता. 2014 साली या मतदारसंघातून एम आय एम पक्षाचे वारिस पठाण निवडून गेले होते.काँग्रेसचे मधु चव्हाण,एमआयएम चे वारीस पठाण या दोन्ही माजी आमदारांचे आव्हान मोडीत काढून त्यांनी २०१९ साली विधानसभेत प्रवेश केला.
कोरोनाच्या काळात उल्लेखनीय काम
कोरोना काळात आपल्या सहकारी शिवसैनिकांसमवेत त्यांनी केलेले काम विशेष लक्षणीय आहे.जे जे रुग्णालय, के इ एम रुग्णालय, कस्तुरबा रुग्णालय ही मुंबई शहरातील मोठी रुग्णालय भायखळा विधानसभा मतदारसंघात येतात. कोरोना काळात या रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत अन्न देण्यास त्यांनी सुरुवात केली.विधानसभा मतदारसंघातील गरजूंना घरोघरी अन्न आणि अन्नधान्य वाटप करण्यात आले. हातावर पोट असणाऱ्या कलाकारांची विशेष काळजी घेण्यात आली. किन्नर बांधवांना शिधा घरपोच पोहोचवण्यात आला.वृद्धांसाठी घरोघरी लसीकरण घेण्यात आले.
चौकांचे सुशोभिकरण
भायखळा हा मुंबई शहरातील मतदारसंघ आहे तसेच मिश्र वस्तीचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. मात्र कोणताही जातीभेद किंवा धर्मभेद न करता यामिनी जाधव यांनी आपले काम सुरू ठेवले.चौकांचे सुशोभीकरण हा यामिनी जाधव यांनी राबवलेला सर्वात महत्त्वाचा उपक्रम.गोविंद परब चौक, महाराणा प्रताप चौक, खडा पारशी अशा विविध चौकात त्यांनी सुशोभीकरण करून घेतले तसेच संरक्षक भिंतींना आकर्षक स्वरूप दिले.स्थानिक महिलांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणारा फूड ट्रक उपक्रम, वाचन संस्कृती वाढवणारा फिरते वाचनालय उपक्रम ही त्यांच्या कारकिर्दीची वैशिष्ट्ये आहेत.
बेस्टला मदत
भायखळा विधानसभा मतदारसंघातील दारूखाना हा परिसर गेल्या अनेक वर्षापासून पाण्यापासून वंचित होता. येथील नागरिक टँकरच्या पाण्यावर सर्वस्वी अवलंबून होते. पती यशवंत जाधव यांच्या सहकार्याने त्यांनी दारूखाना परिसरात पाणी उपलब्ध करून दिले. यामिनी जाधव यांनी मतदारसंघात उपलब्ध करून दिलेल्या मोफत रुग्णवाहिकेचा लाभ अनेक रुग्णांनी घेतला. शंभर वर्ष हून अधिक जुन्या असलेल्या बीआयटी चाळींच्या पुनर्विकासासाठी त्यांनी प्रयत्न केले. माजगाव परिसरात करण्यात आलेल्या या कामामुळे 1347 कुटुंबांना त्याचा लाभ झाला.
मुंबईची अंतर्गत वाहतूक व्यवस्था पाहणाऱ्या बेस्टला त्यांनी 50 कोटी रुपयांचा निधी दिला यातून बसेसची खरेदी, आगाराची दुरुस्ती आणि कामगार वसाहतींच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली. महाराणा प्रताप चौक हा भायखळा विधानसभा मतदारसंघातील सर्वात महत्त्वाचा आणि गजबजलेला चौक आहे. या चौकात महाराणा प्रताप यांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात यामिनी जाधव यांची महत्त्वाची भूमिका आहे. या चौकातच संविधानाची देखणी उद्देशिका उभारण्यात आली आहे.
पाच वर्षांत कामांचा डोंगर
सागरी सुरक्षा पाहणारे सागरी पोलीस ठाणे उभारणी, येथे सुविधा उपलब्ध करून देणे आदींसाठी यामिनी जाधव यांनी अथक प्रयत्न केले.मुंबईतील असंख्य नागरिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला पुनर्विकासाचा प्रश्न त्यांनी आक्रमकपणे सभागृहात मांडला. पी एम जी पी इमारतींचे प्रश्न, उपकर प्राप्त इमारतींचे प्रश्न, रुग्णालयांमधील सुविधांचे प्रश्न, अमली पदार्थांची समस्या त्यांनी सभागृहात आक्रमकपणे मांडले. आई गावदेवी डोंगरावर प्रेक्षणीय अवलोकन सज्जा उभारण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला ज्या प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. त्याशिवाय गावदेवी डोंगर परिसराला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी त्यांनी विशेष पाठपुरावा केला.
म्हणून विजयाची शक्यता अधिक
विविध रक्तदान शिबिरे,आरोग्य चिकित्सा शिबिरे, नेत्रचिकित्सा शिबिरे जाधव यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येतात. नागरिकांना छत्री वाटप,गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, विविध क्रीडा स्पर्धांना आणि सांस्कृतिक उपक्रमांना पाठबळ देण्यातही यामिनी जाधव आघाडीवर असतात. अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी मोठा लोकसंपर्क ठेवला आहे. सर्व समाजात त्यांना मानणारा वर्ग आहे. उद्धव ठाकरे गटाने किंवा महाविकास आघाडीने आपला उमेदवार अजून जाहीर केलेला नाही. एमआयएम देखील या मतदारसंघात उमेदवार देण्याच्या तयारीत आहे त्यामुळे भायखळात शिवसेनेच्या यामिनी जाधव यांच्या विजयाची शक्यता थोडी अधिक आहे
-
पुण्यासाठी मोठी बातमी! पुणेकरांचा प्रवास होणार सुसाट; रामवाडी-वाघोली मेट्रो कामाला गती; हा आहे फायदा -
सोन्याच्या दरात मोठी घसरण! दुबईत 10 तोळे सोने भारतापेक्षा 21 हजाराने स्वस्त; मुंबई, पुण्यातही स्वस्त -
Rajya Sabha Election 2026 Result : राज्यसभेच्या 37 जागांचा निकाल; पाहा विजेत्यांची यादी -
अदानी टोटल गॅसकडून औद्योगिक ग्राहकांसाठी अतिरिक्त नैसर्गिक वायूच्या दरात कपात -
Gold silver price today : सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात मोठी घसरण; वाचा ताजे दर -
Health News : जोडीदाराला किस करणं पडू शकतं महागात! वेळीच सावध व्हा, जाणून घ्या लक्षणं आणि उपाय -
हरीश राणांना कसा दिला जाणार 'इच्छामृत्यू'? व्हेंटीलेटर हटवणे ते अखेरच्या श्वासापर्यंत काय घडतं? वाचा -
काबुल हादरले! रुग्णालयावर भीषण 'एअरस्ट्राइक'; 400 जणांचा मृत्यू, 'त्या' व्हिडिओने जग सुन्न! -
केरळमध्ये पुन्हा 'लाल वादळ' की काँग्रेसची सरशी? ओपिनियन पोलचे आकडे समोर; पाहा कोणाला मिळणार सत्ता! -
प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! महाराष्ट्रात 5 हजार पदांसाठी मेगाभरती; चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा -
Oscars 2026 Winners : ऑस्कर पुरस्कारांची घोषणा हा चित्रपट ठरला सर्वात भारी; पाहा संपूर्ण विनर लिस्ट -
आजचे राशीचक्र: कुणाचे नशीब चमकणार आणि कुणाला संघर्ष करावा लागणार? वाचा आजचे राशीभविष्य







Click it and Unblock the Notifications