Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मंत्री गिरीष महाजन यांचं एकनाथ खडसेंना पुन्हा ओपन चॅलेंज,विधानसभा निवडणूकीत माझा पराभव करुन दाखवा

जळगाव : राज्यात लवकरचं विधानसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर होतील. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षातील नेते आता कामाला लागले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून बैठक घेत विधानसभा निवडणूकीत उमेदवारांसाठी चाचपणी सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्योराप सुरु आहेत. जळगाव जामनेरचे आमदार आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना पुन्हा एकदा ओपन चॅंलेज दिलं आहे.

विधानसभा निवडणूकीत माझा पराभव करुन दाखवा

जळगावमध्ये पक्षाच्या बैठकीत राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी आगामी विधानसभा निवडणूकीवर पक्षाच्या पदाधिका-यांना मार्गदर्शन केलं. महाजन म्हणाले की, माझा पराभव करायचा असेल तर जामनेरला मुक्कामी राहा आणि विधानसभा निवडणूकीत माझा पराभव करुन दाखवा, असं ओपन चॅंलेज मंत्री महाजन यांनी एकनाथ खडसेंना दिलं आहे. तुमच्या बोदवडमध्ये महिनाभरापासून पाणी टंचाई आहे. आधी ती पाणी टंचाईचा प्रश्न सोडवा, मगच विकासाचं बोला, असा टोला ही महाजन यांनी खडसेंना लगावला आहे.

Girish Mahajan on Eknath Khadse

तुम्ही विकास कामांची स्पर्धा करा, तुम्ही मंत्री असताना काय केलं ? मी माझ्या मतदारसंघात मी केलेली विकास कामे बघा. हा जामनेर तालुका आहे. तुम्ही काही भाषण करा, इथं तुमची डाळ शिजणार नाही. तुम्ही काय कारनामे केले आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. पुढे बोलताना महाजन म्हणाले की, त्यांचे जावई दोन वर्ष जेलमध्ये होते. तुम्ही मला कधी दारू पिताना पाहिला आहे का? असा सवाल ही विचारला.

गावची ग्रामपंचायत जिंकू न शकणा-यांनी विकासावर बोलू नये

स्वतःच्या गावची ग्रामपंचायतही जिंकू न शकणारे खडसे यांनी जामनेरच्या विकासावर बोलू नये. मी मी म्हणणारे एकनाथ खडसे यांचं आता काय राहिलं आहे? त्यांच्याकडे जिल्हा बँक राहिली नाही. जिल्हा दूध संघ नाही. आमचे मंगेश चव्हाण मुक्ताईनगरला गेले आणि मंदा खडसे वहिनी यांचा निवडणुकीत पराभव केला. जेव्हा आपण अहंकार करतो, गर्व करतो. सर्व माझ्यामुळे माझ्यामुळेच आहे असं म्हणतो, त्यावेळी कसं गर्व हरण होतं. हे आपण लक्षात घ्यायला हवं, असा टोला महाजन यांनी लावला आहे.

एकदा नार्को टेस्ट करा मग खरं काय खोटं समोर येईल

दरम्यान 2019 ला विधानसभा निवडणूका झाल्या की एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली. त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करताना माझ्यावर अनेक आरोप त्यांनी केले. मी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे, त्यामुळे माझ्यामागे आता ईडी लावतील, माझ्यामागे ईडी लावली तर मग मी सीडी लावेन, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं होतं. त्यावर गिरीष महाजन म्हणाले की, फालतू सारखे नेहमी तेच तेच बोलता. पाचंटासारखं, तुमचं नाही माझं नाही एकदा नार्कोटेस करून घ्या. इंजेक्शन दिलं की माणूस खरं काय, खोटं काय ते सगळं बोलतो. त्याना इंजेक्शन द्या आणि विचारा फरदापुर चं खरं काय खोटं काय. एकदा नार्को टेस्ट करा मग खरं काय खोटं समोर येईल, असं मंत्री गिरीष महाजन यांनी म्हटलं आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+