महादेव जानकर यांचा महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय, सर्व जागा स्वबळावर लढणार

मुंबई : विधानसभा निवडणुकीची काल घोषणा झाल्यानंतर आता महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी महायुतीतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. जानकर यांनी राज्यात स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची माहिती दिली आहे.

राज्यातील 288 विधानसभा मतदार संघात राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार आहे, अशी माहिती महादेव जानकर यांनी दिली आहे. आम्ही आमची ताकती किती आहे. ती आम्हाला बघायची आहे. त्यामुळे ना महायुतीवर ना महाविकास आघाडीवर नाराज नाही, असं जानकर यांनी सांगितले आहे.

Mahadev Jankar Exit Mahayuti

महायुतीतील जागावाटपात महादेव जानकर यांना विश्वासात घेतलं नसल्याने नाराज असल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणूकीसाठी महायुतीकडे जानकर यांनी 30 ते 40 जागांची मागणी केली होती. महायुतीकडून कोणताही प्रतिसाद मिळला नसल्याने जानकर यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

दरम्यान लोकसभा निवडणूकीत परभणीची जागा जानकर यांनी महायुतीच्या माध्यमातून लढवली होती. मात्र परभणीत महाविकास आघाडीचे उमेदवार बंडू जाधव यांच्याकडून त्यांचा मोठा पराभव झाला होता. महायुतीत राहून जानकर यांच्या पक्षाला कोणताही फायदा झाला नाही. त्यामुळे विधानसभा निवडणूकीत तरी महायुतीकडून सम्मानजनक जागा मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र तसं न झाल्याने जानकर यांनी महायुती बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता महादेव जानकर महाविकास आघाडीकडे जातील की महायुतीचे नेते त्यांची नाराजी दूर केली जाईल हे आता पाहवं लागणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+