शिवसेनेच्या दिग्विजय बागल यांच्यामुळे करमाळ्यात नवे चैतन्य, तरुणांचा मोठा प्रतिसाद
Maharashtra Assembly Election 2024 : पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हा राजकीय दृष्ट्या संवेदनशील मानला जातो. जिल्ह्यात बागायती शेती, सहकारी संस्थांचे जाळे, साखर कारखाने मोठ्या प्रमाणात आहेत. विजयसिंह मोहिते पाटील, सुशील कुमार शिंदे, दिलीप सोपल, राजेंद्र राऊत, रणजितसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील, धवलसिंह मोहिते पाटील, शहाजी बापू पाटील, गणपतराव देशमुख, दिगंबर बागल, रश्मी बागल, प्रणिती शिंदे अशा नेत्यांनी सोलापूर जिल्ह्याचे राजकारण गाजवले.
करमाळा तालुका हा सोलापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचा तालुका आहे. या तालुक्यावर बागल परिवाराचे वर्चस्व असल्याचे दिसून येते. येथील साखर कारखानदारी बागल परिवाराच्या ताब्यात आहे. रश्मी बागल यांनी करमाळा माढा विधानसभा मतदारसंघात पित्याचा वारसा चालवण्याचा प्रयत्न केला. पण 2014 साली थोडक्या मतांनी त्यांचा पराभव झाला. 2019 साली झालेल्या निवडणुकीत संजय मामा शिंदे अपक्ष म्हणून निवडून आले आणि नारायण पाटील तसेच रश्मी बागल यांचा पराभव झाला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी बागल परिवारातील दिग्विजय बागल यांना उमेदवारी दिली असून त्यांच्या विरोधात महायुतीचे नारायण पाटील उमेदवार आहेत. संजय मामा शिंदे ही अपक्ष म्हणून निवडणूक लढणार आहेत.

2019 झालेल्या निवडणुकीत रश्मी बागल यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती तर संजय मामा शिंदे अपक्ष निवडणूक लढत होते. तर या निवडणुकीत महाविकास आघाडी कडून लढणारे नारायण पाटील हे देखील तेव्हा अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात होते.
तरुण नेतृत्वाला संधी
सध्या या मतदारसंघात माढा आणि करमाळा असे दोन तालुके येतात. नारायण पाटील आणि दिग्विजय बागल हे करमाळा तालुक्यातील असून संजय मामा शिंदे हे माढा तालुक्यातील आहेत. संजय मामा शिंदे हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते आणि त्यांनी मतदारसंघात आपला दबदबा कायम ठेवला होता. यावेळी चित्र पालटले असून बागल परिवाराकडून अनपेक्षितपणे दिग्विजय बागल हे तरुण व्यक्तिमत्व पुढे आले आहे.
रश्मी बगल यांचाही सहभाग
करमाळा तालुक्यातच बागल परिवाराचे वर्चस्व आहे. तसेच माढा तालुक्यातूनही बागल परिवाराला चांगले समर्थक मिळत आहे. दिग्विजय बागल यांनी आपल्या प्रचार फेरीला सुरुवात केली असून त्यांना तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. रश्मी बागल यादेखील दिग्विजय बागल यांच्या प्रचारात हिरीरीने सहभागी होत असून त्यांनाही महिलांचा प्रतिसाद मिळत आहे. बागल परिवाराची बदनामी करण्याचे विरोधकांचे षडयंत्र असल्याचे त्या मतदारांना पटवून देत आहेत. दिग्विजय बागल यांची पाटी तशी कोरी असल्याने त्याचाही फायदा त्यांना होत असल्याचे दिसून येत आहेत.
बागल गटाला नवी उभारी
सलगच्या पराभवामुळे बागल गट काहीसा कमकुवत झाला होता. नेतृत्वहीन झालेल्या या गटाला तडफदार आणि तरुण नेतृत्वाची आवश्यकता होती. ते नेतृत्व दिग्विजय बागल यांच्या रूपाने मिळाले आहे. दिग्विजय बागल सक्रिय झाल्यामुळे कमकुवत झालेल्या बागल गटाला नवी उभारी मिळाल्याचे दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांनीही दिग्विजय बागल यांना ताकद देण्याची भूमिका घेतली आहे. भूम परंडाचे आमदार आणि राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनीही बागल गटाला रसद दिली आहे. बागल परिवाराची यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक होती. त्यामुळे राष्ट्रवादीतील जुन्या कार्यकर्त्यांचा बागल परिवाराला पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.
राज्यात महायुती सरकारने दमदार कामगिरी केली आहे. पायाभूत सुविधांचे अनेक प्रकल्प महायुती सरकारच्या कार्यकाळात पूर्ण झाले आहेत. ग्रामीण भागात रस्ते पाणी आणि पायाभूत सुविधा देण्याकडे महायुतीचा विशेष कल आहे. करमाळा माढा मतदारसंघात बागल परिवाराप्रमाणेच भाजपचीही चांगली ताकद आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मोठा प्रभाव संपूर्ण राज्याप्रमाणेच या मतदारसंघातील महिलांवरही दिसून येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे नारायण पाटील आणि अपक्ष संजय मामा शिंदे यांचा चक्रव्यूह दिग्विजय बागल सहज भेदतील असे चित्र सध्या दिसत आहे
-
पुण्यात गॅसवरची दाहिनी बंद! घरगुती सिलेंडरसाठी 'एवढे' दिवस वाट पाहावी लागणार, हॉटेलंवर टंचाईचे सावट -
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
IPL 2026 Schedule : आयपीएलचा थरार 'या' तारखेपासून! RCB विजयाचा गड राखणार का? वाचा संपूर्ण वेळापत्रक -
LPG gas connection ekyc : एलपीजी ग्राहकांनो! ई-केवायसी करा, अन्यथा गॅस मिळणे बंद; जाणून घ्या प्रोसेस











Click it and Unblock the Notifications