Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

महायुतीच्या योजना आणि अडसूळांची आक्रमकता, दर्यापूरात महायुतीचं गणित जुळणार..?

Maharashtra Assembly Election 2024: राखीव मतदारसंघ असलेल्या दर्यापूर मतदारसंघातून शिवसेनेच्या शिंदे गटाने माजी आ. अभिजीत अडसूळ यांना उमेदवारी दिली आहे. अभिजीत अडसूळ हे या मतदारसंघात ही तिसरी निवडणूक लढवत आहेत. 2009 साली ते याच मतदारसंघातून आमदार होते. मात्र 2014 ला त्यांचा पराभव झाला. त्यानंतर गेल्यावेळी म्हणजेच 2019 ला हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला.

आता तिसऱ्यांदा शिवसेनेने पुन्हा आडसूळांवर विश्वास दाखवला. या मतदारसंघात ठाकरे गटाकडून गजानन लवटे यांना रिंगणात उतरविण्यात आले आहे. ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर मविआतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसला धक्का बसला. कारण ही जागा काँग्रेसला मिळेल, अशी शक्यता होती. आता मविआतील नाराजी व महायुतीने गेलेल्या पाच वर्षांतील विकासकामे या जोरावर आडसूळ बाजी मारतील का, हे पहावे लागेल.

Shivsena Abhijeet Adsul

कशी आहे दर्यापूरची गणिते

दर्यापूर मतदारसंघात महायुतीकडून शिवसेनेचे अभिजीत आडसूळ, ठाकरे गटाचे गजानन लवटे आणि युवा स्वाभिमान पक्षाचे माजी आ. रमेश बुंदिले हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काँग्रेसच्‍या उमेदवारीसाठी रिपाइं सोडून काँग्रेसमध्‍ये आलेले रामेश्‍वर अभ्‍यंकर, तसेच नागपूर येथील उद्योजक गुणवंत देवपारे हे दर्यापूरातून काँग्रसचे प्रबळ दावेदार मानले जात होते. सामाजिक कार्यकर्ते विजय विल्‍हेकर यांच्‍या नावाचीही चर्चा होती, पण शिवसेनेने उमेदवार जाहीर केल्‍याने आता काँग्रेसमधील इच्‍छुक उमेदवार कोणती भूमिका घेतात, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीतील वेबनाव महायुतीच्या उमेदवारासाठी पोषक असल्याचे बोलले जात आहे.

वडिलांची पुण्याई येणार कामी

या मतदारसंघात महायुतीने शिवसेनेच्या अभीजीत अडसूळांना उमेदवारी दिली आहे. यापूर्वी ते याच मतदारसंघातून आमदार असल्याने त्यांची मतदारसंघावर चांगली पकड आहे. शिवाय वडिल माजी खा. आनंदराव अडसूळ यांनाही महायुतीने राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्षपद दिल्याने त्यांची ताकदही आडसूळ यांच्या पाठीशी उभी राहणार आहे. शिवाय महायुतीने या मतदारसंघात अनेक विकासकामे केल्याने सध्यातरी अडसूळांचे पारडे जड समजले जात आहे.

अमरावतीसाठी सरकारचा हात सैल

अमरावती जिल्ह्यात कापूस, तूर, सोयाबीनचे अधिक प्रमाणात उत्पादन होते. मात्र त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग अमरावती जिल्ह्यात नाहीत. संपूर्ण कच्चा माल बाहेर पाठविला जात असल्याने अपेक्षित रोजगार निर्माण होऊ शकला नाही. शेतकऱ्यांनाही अत्यल्प दरात मालाची विक्री करावी लागत असल्याचे वास्तव आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रक्रिया उद्योगांची पायाभरणी करण्याची मागणी जोर धरत होती. आता महायुती सरकारने या मागणीकडे गांभीर्याने पाहत नवीन उद्योग येथे आणण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. लवकरच अंजनगाव टेक्सटाईल व जिल्ह्यातील इतर उद्योग आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. त्याचा फायदा अडसूळ यांना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महायुतीकडून नव्या उद्योगांची घोषणा

अमरावतीतील सातूर्णा, बडनेरा मार्गावरील एमआयडीसी आणि नांदगाव पेठ येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योग उभारणी झाली. 2021 मध्ये टेक्सटाइल पार्क उभारण्यात आला.30 वस्रोद्योग प्रकल्पांची घोषणा करण्यात आली. सद्य:स्थितीत या एमआयडीसीमध्ये श्याम इंडोफॅब, सीयाराम, रेमंड, व्हीएचएमएस, धनलक्ष्मी असे केवळ 11 उद्योग सुरू आहेत. उर्वरित 19 कंपन्या लवकरच येणार आहेत. यापूर्वी अमरावती, दर्यापूर, बडनेरा, अचलपूर या ठिकाणी कापड गिरण्या अस्तित्वात होत्या. त्यांचे अस्तित्व आज संपुष्टात आले आहे. त्या कंपन्यांबाबतही महायुती सरकार लवकरच निर्णय घेणार आहे. अंजनगाव सुर्जी, चांदूर रेल्वेमधील साखर कारखाने डबघाईस आले आहेत. ते कारखानेही लवकरच सुरु करण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरु आहेत.

लाभार्थी महिलांवर महायुतीची भिस्त

दर्यापूर विधानसभा मतदारसंघात शासनाच्या शेकडो योजनांचे हजारो लाभार्थी आहेत. सर्वात यशस्वी ठरलेल्या लाडकी बहिण योजनेचेही तालुक्यात 46 हजारांच्या आसपास लाभार्थी महिला आहेत. या सगळ्या लाभार्थ्यांकडून महायुतीला जिल्हाभर चांगल्या प्रतिसादाची अपेक्षा आहे. शिवाय अभिजीत अडसूळ यांनीही शासकीय योजना घरोघर पोहोचविण्यासाठी यापूर्वी प्रयत्न केले आहेत. त्याचाही लाभ त्यांना यंदाच्या निवडणुकीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकंदर ठाकरे गटाने महाविकास आघाडीकडून अचानक जाहीर केलेली उमेदवारी आणि महायुतीचा नियोजनबद्ध प्रचार या जोरावर अडसूळ यांचे पारडे सध्यातरी जड दिसत आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+