Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सणवार लक्षात घेऊन महाराष्ट्रातील निवडणुका जाहीर करणार, EC राजीव कुमार यांची माहिती, वाचा सविस्तर

Election Commission PC : केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या 2 दिवसांत राज्यातील राजकीय पक्ष व विविध संस्थांशी चर्चा करुन विधानसभा निवडणुकांसाठीचा आढावा घेतला आहे. त्यानंतर, आज पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठीची महत्वाची माहिती दिली. निवडणुकाच्या तारखा प्रामुख्याने सण उत्सवाच्या नंतर जाहीर केल्या जाव्यात, अशी विनंती राज्यातील सर्व पक्षांनी केल्याची माहिती राजीव कुमार यांनी दिली. ते माध्यमांशी संवाद साधत होते.

Maharashtra Assembly Election 2024

सणवार लक्षात घेऊन मतदानाची तारीख ठरवणार

राजीव कुमार म्हणाले, आम्ही दोन दिवस विविध राजकीय पक्षांसह सर्वच भागिदारांशी चर्चा केली. त्यात सर्वच पक्षांनी दीपावली, देव दिवाळी व छटपूजेसारखे सणवार लक्षात घेऊन निवडणुकीची तारीख निश्चित करण्याची विनंती केली.

राजकीय पक्षांनी निवडणुकीची तारीख आठवड्याच्या मध्यभागी ठेवण्याचीही सूचना केली. त्यांची ही सूचना अत्यंत महत्त्वाची आहे. कारण, निवडणुकीची तारीख आठवड्याच्या शेवटी ठेवल्यामुळे शहरी भागातील मतदार सुट्ट्यांचा मेळ साधून शहराबाहेर जातात. त्याचा फटका निवडणुकीच्या टक्केवारीला बसतो. त्यामुळे मतदानाची तारीख आठवड्याच्या मध्यभागी ठेवली जावी अशी त्यांची विनंती होती, असे राजीव कुमार म्हणाले.

रांगेत ताटकळत उभे राहण्याची गरज पडणार नाही

लोकसभा निवडणुकीत मुंबईसह अनेक शहरांतील मतदान केंद्रांवर मतदारांची तासंतास ताटकळत उभे राहण्यासारखी गैरसोय झाली होती. त्यामुळे आगामी निवडणुकीत असे प्रकार टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची सूचनाही काही पक्षांनी केली. आयोग यासंबंधी खुर्च्या उपलब्ध करून देण्यावर विचार करेल. काही पक्षांनी निवडणुकीच्या काळात अधिकाऱ्यांच्या बदल्या तटस्थपणे करण्यावर जोर दिला. काहींनी पैशांच्या गैरवापराकडेही लक्ष वेधले. विशेषतः काही पक्षांनी वृद्ध व दिव्यांग मतदारांना दूरच्या मतदान केंद्रांपर्यंत घेऊन जाण्यात येणाऱ्या अडचणींवर योग्य ती उपाययोजना करण्याची विनंती केली. मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात येणारा पोलिंग एजंट त्याच बूथवरील असावा असा आग्रहीही काही पक्षांनी धरला. निवडणूक आयोग यावरही योग्य तो निर्णय घेईल. निवडणुकीच्या काळात फेक न्यूजची मोठी समस्या असते. त्यावरही काही पक्षांनी चिंता व्यक्त केली, असे राजीव कुमार यांनी सांगितले.

विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर रोजी संपणार

राजीव कुमार यांनी यावेळी महाराष्ट्रातील मतदारांची संख्या व इतर आकडेवारी सांगितली. ते म्हणाले, महाराष्ट्रात 288 मतदारसंघ आहेत. यापैकी 25 मतदारसंघ अनुसूचित जमाती (एसटी), तर 29 मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी (एससी) राखीव आहेत. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया त्यापूर्वी पार पाडली जाईल.

एटीएम पैशाचा पुरवठा करणाऱ्या वाहनावर निर्बंध घालणार

राजीव कुमार म्हणाले की, राज्यातील मतदारांची संख्या, पुरुष, महिला, तृतीयपंथी मतदार आणि मतदारांमध्ये झालेल्या वाढीसंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांनी माहिती दिली. तसेच, निवडणूक काळात काही निर्बंध घालण्यात येणार असून एटीएमसाठी पैशांचा पुरवठा करणाऱ्या व्हॅनला वेळेचे बंधन असणार आहे. तसेच, याकाळात अँब्युलन्स, बँक आणि पतसंस्था यावर देखील लक्ष ठेवलं जाईल, असेही ते म्हणाले.
एटीएमसाठी पैसै घेऊन जाणाऱ्या गाडीला निवडणुक काळात रात्री 6 ते सकाळीं 8 पर्यंत पैसे वाहतूक करता येणारं नाही. याकाळात अँब्युलन्स, बँक आणि पतसंस्थांवर देखील लक्ष ठेवलं जाईल.

राज्यात एकूण 288 विधानसभा मतदारसंघांत निवडणूक होत आहे. त्यासाठी, राज्यात पुरुष मतदार 4. 95 कोटी आणि स्त्री मतदार 4.64 कोटी आहेत, थर्ड जेंडर म्हणजेच तृतीयपंथी मतदारांची संख्या 5997 असून राज्यातील दिव्यांग मतदार 6.32 लाख एवढे आहेत. यंदा पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवयुवकांची संख्या म्हणजे नव मतदार 19.48 लाख एवढे आहेत. राज्यांत महिला मतदारांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून 10.77 लाख मतदार आहेत.

पोलिंग स्टेशन 1 लाख 186 असणार

शहरातील मतदान बुथ केंद्रांची संख्या 42 हजार 585, तर ग्रामीण महाराष्ट्रात 57 हजार 601 मतदान बुथ केंद्र असणार आहेत. काही ठिकाणीं तरूण अधिकारी बूथ मँनेज करतील. 350 असे बूथ असतील जिथे तरुण अधिकारी बूथ मॅनेज करतील.

या अॅपवर तक्रार करता येणार

निवडणूक आयोगाच्यावतीने सुविधा पोर्टल नावाने अॅप जारी करण्यात आलं आहे. या एप्लिकेशन्सवर मतदारांना तक्रार करता येणार आहे. एखाद्या ठिकाणीं काही घटना घडली किंवा उशीरापर्यंत मतदान सुरु असेल तर केवळ फोटो काढून या एप्लिकेशन्सवर अपलोड केला की, 90 मिनिटांत निवडणुक आयोगाची टीम तिथं पोहचेल, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+