Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी या 12 पैकी लागणार कोणतेही 1 ओळखपत्र, घ्या जाणून

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार थांबला असून उद्या 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.महत्वाची बाब म्हणजे मतदान केंद्रावर मतदानासाठी आवश्यक ओळखपत्र नसेल तर तुम्हाला मतदान करण्यास मज्जाव केला जाऊ शकतो. त्यासाठी आपल्याकडे योग्य ओळखपत्र असणे आवश्यक आहे. मतदानासाठी कोणते ओळखपत्र आवश्यक आहे हे ज्यामुळे आपण मतदान करू शकतो हे पाहुया.

निवडणूक आयोगाने मतदारांसाठी ओळखपत्रांबाबत काही आवश्यक सूचना दिल्या आहेत. मतदान करताना मतदार फोटो ओळखपत्र आवश्यक आहे. मात्र, जर तुमच्याकडे मतदार ओळखपत्र नसल्यास, आणखी 12 प्रकारच्या ओळखपत्रांचा वापर करून आपण आपला मतदानाचा हक्क बजावू शकता. ही ओळखपत्रे अशी आहेत.

Maharashtra Assembly Election 2024 Any 1 of these 12 ID cards

मतदान कार्ड नसेल तर यापैकी एक ओळखपत्र सोबत असू द्या

  • आधार कार्ड
  • मनरेगा जॉब कार्ड
  • बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये असलेले फोटोसह पासबुक
  • कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत विमा स्मार्ट कार्ड
  • वाहन चालक परवाना
  • पॅनकार्ड
  • नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड
  • भारतीय पासपोर्ट
  • फोटोसह पेन्शन दस्तऐवज
  • केंद्र, राज्य सरकार किंवा सार्वजनिक उपक्रमाने जारी केलेले ओळखपत्र

..ओळखपत्र असेल तर मतदानाची संधी

यापैकी कोणतेही एक ओळख पत्र मतदान केंद्रावर दाखवले की मतदार मतदान करू शकणार आहे. निवडणूक आयोगाने या कागदपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र मतदान केंद्रावर दाखवल्यास आपण मतदान करू शकतो. या सोयीमुळे प्रत्येक मतदाराला मतदान करण्याची संधी मिळणार आहे, मग ते मतदार ओळखपत्र असो किंवा अन्य कोणतेही पुरावे असो.

.. म्हणून ओळखपत्र सोबत ठेवा

मतदान हा लोकशाहीचा महत्त्वाचा घटक आहे. आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आणि एक जबाबदार नागरिक म्हणून आपलं योगदान देण्यासाठी मतदान करणे अत्यंत गरजेचं आहे. आपले ओळखपत्र सोबत ठेवले तर 20 नोव्हेंबरला मतदान करून लोकशाही मजबूत करण्यात तुमचा मोठा वाटा असेल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+