Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

लोकशाहीचा 'डाग' पुसला जातोय? बोगस मतदानासाठी आयोगाचाच हातभार?, विरोधकांचा निशाणा, पाहा-Video

Voting ink controversy : मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत आज मतदानाचा उत्साह असतानाच एका गंभीर तांत्रिक मुद्द्याने खळबळ उडवून दिली आहे.

मतदाराच्या बोटावर लावली जाणारी 'अविभाज्य' शाई नेलपॉलिश रिमूव्हर वापरून सहजपणे निघत असल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. या प्रकारानंतर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, निवडणूक आयोग 'बोगस मतदाना'ला खतपाणी घालत असल्याचा खळबळजनक आरोप राजकीय पक्षांनी केला आहे.

voting ink controversy

काँग्रेसचा व्हिडिओ व्हायरल; सचिन सावंतांचा थेट सवाल

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्यांच्या पत्नीच्या बोटावरील शाई नेलपॉलिश रिमूव्हरने काही सेकंदात पुसली गेल्याचे दिसत आहे.

"राज्य निवडणूक आयोगाकडून यावेळी प्रचंड गैरव्यवस्थापन झाले आहे. शाईची टेस्टिंग कोणी केली? अगोदरच काळजी का घेतली नाही?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रकाराला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सावंतांनी केली आहे.

"अत्यंत लाजिरवाणी गोष्ट" - वर्षा गायकवाड यांचा संताप

काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी या प्रकाराला 'लोकशाहीसाठी लाजिरवाणे' म्हटले आहे. त्यांच्या मते, ही केवळ शाईची समस्या नसून निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासार्हतेचा प्रश्न आहे. "आज सकाळपासून अनेक रिपोर्ट मिळत आहेत की शाई पुसली जात आहे. मतदार यादीतून नावे गायब असणे, आयोगाची वेबसाइट क्रॅश होणे आणि आता ही पुसली जाणारी शाई; यावरून स्पष्ट दिसते की निवडणूक आयोग आणि बीएमसीला पारदर्शकतेची पर्वा नाही."

शाईत भ्रष्टाचार की 'महाशक्ती'चा दबाव? - रोहित पवार

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणाला थेट 'बोगस मतदाना'शी जोडले आहे. "शाई सहज पुसली जाणे म्हणजे दुबार मतदानासाठी आयोगाने लावलेला हातभार नाही का?" असा प्रश्न त्यांनी विचारला. "बोगस मतदानाच्या माध्यमातून जिंकण्यासाठी महाशक्तीच्या दबावातून ही शाई वापरली गेली की या शाईतही भ्रष्टाचार झाला?" याचा खुलासा आयोगाने करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

निवडणूक आयोगाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह

'आप' नेते आणि सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी या संपूर्ण प्रक्रियेवरच टीकेची झोड उठवली आहे. बोटावरची शाई पुसली जाणे, व्हीव्हीपॅट नसणे, ईव्हीएम बिघाड, मतदारांना केंद्र न मिळणे आणि पैशांचे वाटप अशा अनेक बाबींमुळे निवडणूक प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. "आधीपासूनच तसे सुरू आहे" असे म्हणून आयोग नागरिकांची बोळवण करू शकत नाही. आयोगाचे स्वतःचे काही अस्तित्व आहे की नाही? असा बोचरा सवाल त्यांनी केला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+