Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भरतशेठ गोगावले; सामान्य कुटुंबातील अस्सल शिवसैनिक, चौथ्यावेळी महाडच्या रिंगणात

Mahad Assembly election 2024 mla Bharat Gogavale : मुंबई आणि मराठवाड्यापाठोपाठ रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिवसेनेला मोठे पाठबळ लाभले. कित्येक शिवसैनिकांना कोकणातील जनतेने आमदार म्हणून विधानसभेत पाठवले. शेतकरी कामगार पक्ष, जनता दल, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा पक्षांना चारीमुंड्या चीत करत साध्या साध्या शिवसैनिकांनी विधानसभेचे मैदान मारले. असेच एक शिवसैनिक म्हणजे भरत शेठ गोगावले.

साध्या शेतकऱ्याचा मुलगा आणि तळागाळात संघर्ष करणारा कार्यकर्ता ते आमदार अशी गोगावले यांची वाटचाल आहे. गेल्या तीन टर्म पासून भरत शेठ रायगड जिल्ह्यातील महाड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. तळागाळात असलेला संपर्क, रांगडी भाषा, थेट आणि बिनधास्त स्वभाव आणि सामान्य माणसाच्या मदतीला धावून जाण्याची वृत्ती तसेच सहज संपर्क यामुळे भरतशेठ मतदार संघात प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यांच्या निवासस्थानी सामान्य जनतेचा प्रचंड राबता असतो.

Mahad Assembly election 2024 mla Bharat Gogavale

मतदार संघात कुठेही गेले तरी त्यांच्याभोवती लोकांचा गराडा पडतो. महाड तालुक्यातून मुंबई वास्तव्यासाठी असलेल्या लोकांशीही त्यांचा थेट कनेक्ट आहे. विशेषतः उपचारांसाठी जे जे रुग्णालयात दाखल करण्यात येणारे रुग्णांच्या मदतीसाठी भरतशेठ नेहमी तत्पर असतात. "जे मनात तेच ओठात" असा सरळसोट स्वभाव असल्यामुळे भरतशेठ यांना कोणत्याही अडचणी कधी येत नाहीत.

एकनाथ शिंदे यांना साथ

महाड विधानसभा मतदारसंघातून त्यांनी तीनवेळा प्रतिनिधित्व केले आहे. 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेचे तत्कालीन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती मोडली आणि काँग्रेस राष्ट्रवादीशी घरोबा केला. उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री झाले आणि उद्धव यांचे पुत्र आदित्य यांनाही कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले. उद्धव ठाकरे मंत्रिमंडळात भरत शेठ भोगावले यांना संधी मिळेल, अशी चर्चा होती पण महाविकास आघाडीच्या तीन पक्षांच्या गर्दीत भरत शेठ यांना संधी मिळाली नाही. 2022 आली एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंद केले आणि शिवसेनेसह सरकारही एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात आहे. पक्षाची अधिकृत निशाणी देखील एकनाथ शिंदे यांना देण्यात आली. एकनाथ शिंदे यांना सुरुवातीपासून साथ देणारा आमदार म्हणजे भरत शेठ गोगावले होय.

महाडमधून पुन्हा रिंगणात

एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात तरी भरत शेठ यांना मंत्रिपद मिळेल असे वाटत होते पण भरत शेठ पक्षाचे प्रतोद झाले. मंत्रिपद न मिळाल्याची नाराजी यांनी फारशी कधी व्यक्त केली नाही. पक्षाचे आणि संघटनेचे काम त्यांनी सुरूच ठेवले. एकनाथ शिंदे यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी भरत गोगावले यांना पुन्हा एकदा महाड विधानसभा मतदारसंघातून संधी दिली आहे.

एमआयडीसीमध्ये सुविधांवर भर

महाड विधानसभा मतदारसंघात गेल्या तीन टर्ममध्ये भरत शेठ गोगावले यांनी पायाभूत सुविधा विकासाची अनेक कामे पूर्ण करून घेतली.. विशेषतः एमआयडीसीमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासावर त्यांनी अधिक भर दिला तसेच नव्या कंपन्यांसाठी अधिक जागा उपलब्ध करून देण्यात आली. या कंपन्यांमध्ये आदित्य बिर्ला, पेप्सीको, सुदर्शन केमिकल्स, पिरामल फार्मा तसेच अन्य नामांकित कंपन्यांचा समावेश आहे. यामुळे रायगड जिल्ह्यातील आणि महाड परिसरातील असंख्य तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत .

रायगड परिसरात विकासकामे

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून रायगड हा किल्ला उभारला. रायगड किल्ला प्राधिकरणच्या माध्यमातून किल्ला परिसरात भरत गोगावले यांनी अनेक कामे करून घेतली त्यामुळे किल्ल्यावर जाणाऱ्या शिवभक्तांसाठी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. महाडहून रायगडला जाणाऱ्या रस्त्याचे भरतशेठ गोगावले यांच्या प्रयत्नातून काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे या ऐतिहासिक ठिकाणी जाण्यासाठी नागरिकांना सुविधा उपलब्ध होत आहेत. तसेच रायगड किल्ल्यापर्यंत जाणारा रस्ते प्रवास अधिक सुखकर आणि आरामदायी होत आहे. या माध्यमातून पर्यटकांची संख्याही वाढणार असून त्यातून स्थानिकांना अधिक रोजगार मिळणार आहे.
दादली पूल पूर्णत्वास

सावित्री ही महाडमधून वाहणारी सर्वात महत्त्वाची नदी आहे. भरत शेठ गोगावले यांच्या प्रयत्नातून सावित्री नदीवर दादली पूल पूर्ण करण्यात आला आहे. या पुलाची पूर्तता झाल्यामुळे सावित्री नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना वाहतुकीची चांगली सुविधा उपलब्ध होत आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत होत असून रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत.

सावित्री नदीतील गाळाचा उपसा

सावित्री नदी ही महाडमध्ये महत्त्वाची नदी असली तरी पावसाळ्यात ती रौद्ररूप धारण करते. दरवर्षी उद्भवणारी पुराची समस्या ही महाड शहराची मोठी डोकेदुखी आहे. शहरात व्यापार उद्योग करणाऱ्या अनेक नागरिकांनी पुराच्या समस्येला कंटाळून शहरातून स्थलांतर करण्याचा निर्णय जवळपास घेतला होता. पण 2022 - 23 या वर्षात भरत शेठ गोगावले यांचे नेतृत्वाखाली सावित्री नदीपात्राची स्वच्छता आणि गाळ काढण्याची मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवण्यात आली. त्याचा परिणाम म्हणून सावित्री नदीचे पात्र खोल झाले आहे आणि त्यामुळेच येथील नागरिकांमध्ये पुरापासून सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

महाडमध्ये पारडे जड

मोकळ्या ढाकळ्या स्वभावामुळे भरत शेठ गोगावले यांना मानणारा मोठा वर्ग महाड परिसरात आहे. शिवसेनेची हक्काची वोट बँक त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. भारतीय जनता पक्षाने देखील आपली ताकद भरत शेठ यांच्या मागे उभी केली आहे. रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचीही चांगली ताकद आहे ते देखील महायुतीचा भाग असल्यामुळे महाडच्या विधानसभा निवडणुकीत भरत शेठ गोगावले यांचे पारडे सध्या तरी जड दिसते आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+