महाराष्ट्रात महाविकास आघाडीला संधी! फडणवीस, ठाकरेंना सीएम म्हणून पसंती
मुंबई - नुकत्याच लोकभा निवडणूका झाल्या. त्यात महयुतीची पिछेहाट झाली. त्यामुळे विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीसाठी धोक्याची घंटा असतानाच राज्यात महाविकास आघाडी सत्तेत येईल असे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. महाविकास आघाडीला 48.7 टक्के लोकांची पसंती आहे. विशेष म्हणजे राज्याचा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना जनतेने समान पसंती दिली आहे.
अहवाल जुलैच्या पहिल्या आठवड्याचा
महाराष्ट्रातील सकाळ माध्यम समुहाने केलेल्या सर्व्हेक्षणातून हा अंदाज समोर आला आहे. हे सर्वेक्षण जुलैच्या पहिल्या आठवड्यातील आहे. या सर्वेक्षणाचा हा ताजा अहवाल असून आगामी काळात चित्र वेगळेही असू शकते.

सर्वे सांगतो.. मविआ सत्तेत येऊ शकते
राज्यात देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता अजूनही कायम असून कालच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत त्यांची जादू दिसुन आली. कालच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला दोनच जागा जरी मिळाल्या तरीही त्यांच्यासाठी फार चिंता करण्याची गरज सध्यातरी नाही. कारण सर्व्हेक्षणातून महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर त्यांची सत्ता येऊ शकते असा सर्वेचा कल आहे.
उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीसांना समान पसंती
या सर्वेक्षणात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची टक्केवारी समान आहे. उद्धव ठाकरेंना 22.4 तर देवेंद्र फडणवीस यांना 22.4 टक्के लोकांनी मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे. तर एकनाथ शिंदेंना 14.5 टक्के लोकांनी तर सुप्रिया सुळेंना 6.8 टक्के, अजित पवारांना 4.2 टक्के लाकांनी मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे.
मविआला 48.7 टक्के पसंती
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुशंगाने हा सर्वे करण्यात आला. त्यात महाविकास आघाडीला 48.7 टक्के जनतेने महायुतीला 33.1 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. भाजपची लोकप्रियता राज्यात घडल्याचे या सर्वेतून दिसून येत आहे. भाजपला 28.5 टक्के जनतेने पसंती मिळाली आहे. तर 4.9 टक्के लोकांचा कोणत्याही पक्षावर विश्वास नसून 13.4 टक्के लोकांनी मत कुणाला द्यायचे हे ठरवले नसल्याचे दिसून आले आहे.
मविआत काँग्रेस वरचढ
महाविकास आघाडीतील पक्षांचाच विचार केल्यास काँग्रेसला 37.1 टक्के, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 18.5 टक्के, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 13.6 टक्के तर 30.8 टक्के सर्वघटक पक्षांना जनतेने पसंती दिली आहे.
महायुतीत शिंदेंची शिवसेना वरचढ
महायुतीतील पक्षांचाच विचार केल्यास एकूण विचार केल्यास 22.9 टक्के लोकांची भाजपला, अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला8.7 टक्के , एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 37.2 टक्के तर उर्वरीत घटक पक्षांना 30.8 टक्के लोकांची पसंती आहे. राज्यभरातील 288 विधानसभा मदतासंघातील 84 हजार 529 जनतेशी संवाद साधून हा सर्वे करण्यात आला आहे.












Click it and Unblock the Notifications