आधी तिकीटाला विरोध आता थेट राज्यमंत्रीपदाला गवसणी... कोण आहेत माधुरी मिसाळ
madhuri misal biography : महायुतीच्या मंत्रीपदाच्या यादीत पुण्यातील माधुरी मिसाळ यांचे नाव फायनल झाले. त्यानंतर सलग चौथ्यांदा आमदार झालेल्या माधुरी मिसाळ या पुन्हा एकदा चर्चेत आल्या. ज्या आमदाराच्या तिकीटाला सुरुवातीला विरोध झाला त्याच माधुरी मिसाळ यांनी आज राज्य मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
नगरसेविका ते आमदार
माधुरी मिसाळ या गेल्या २० वर्षांपासून भाजपच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या आहेत. कसबा मतदारसंघातून त्या पहिल्यांदा २००७ साली नगरसेविका झाल्या. त्यानंतर त्यांना भाजपने पर्वती मतदारसंघातून २००९ साली पहिल्यांदा तिकीट दिलं. त्या निवडणुकीत त्या विजयी झाल्या. त्यानंतर आत्तापर्यंत त्यांनी सलग चार वेळा पर्वती मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. २००९, २००१३, २००९ आणि २०२४ अशा सलग चार टर्म आमदारकी मिळविणाऱ्या माधुरी मिसाळ या महाराष्ट्रातील एकमेव महिला आहेत. त्यांनी महापालिकेतही भाजपचे २२ नगरसेवक निवडून आणत आपल्या नेतृत्वाची झलक दाखवलेली आहे.

भूषविलेली पदे
माधुरी मिसाळ या महाराष्ट्र भाजपच्या सचिव होत्या. महाराष्ट्र लोकलेखा समितीच्या सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. भाजपच्या पुणे शहराध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली आहे. पुणे महानगरपालिकेच्या त्या माजी सदस्यही होत्या. तसेच विधानसभेच्या त्या प्रतोदही राहिल्या आहेत. याशिवाय तीर्थ रिअल इस्टेट, सतीश मिसाळ एज्युकेशन फाउंडेशन, उद्यम को-ओपरेटीव्ह बँक, विद्या को-ऑफरेटिव्ह बँक, शिक्षण प्रसारक मंडळ यामध्येही त्यांनी काम केले आहे.
विकासकामांमध्येही योगदान
पार्वती मतदारसंघाचे नेतृत्व करताना माधुरी मिसाळ यांनी अनेक कामे मार्गी लावली. स्वारगेट येथील मल्टी माँडेल ट्रान्सपोर्ट हब, ५०० खाटांचे रुग्णालय, पु. ल. देशपांडे उद्यानातील कलाग्राम, खडकवासला ते खराडी मेट्रीसाठीही माधुरी मिसाळ यांनी योगदान दिलेले आहे. सिंहगड उड्डाणपूल हा त्यांच्याच कारकीर्दीतील आहे. याशिवाय गंगाधाम फ्लायओव्हर, तुळजाई वन नियोदन, पर्वती टेकडी संवर्धन ही सारी विकासकामे माधुरी मिसाळ यांच्या आमदारकीच्या काळात मार्गी लागलेली आहे.












Click it and Unblock the Notifications