तुमच्या लाईफ पार्टनरमध्ये जर 'हे' बदल दिसले तर..समजून घ्या की ते तुम्हाला फसवत आहेत! हे कसे ओळखायचे?
Life Partners Extra Marital Affair : नाते हे तीन अक्षरी शब्दावर आधारीत असते तो शब्द नात्याला पुर्णत्व देतो आणि परस्पराबाबत प्रेमाचे प्रतिक होते तो शब्द म्हणजे विश्वास..होय विश्वास पती-पत्नी असो कि प्रियकर-प्रेयसी किंवा कोणत्याही नातेसंबंधांसाठी महत्वाचा आहे. त्यात जर खोट आली तर तुमच्या आयुष्यात वादळ आलेच म्हणून समजा. विश्वासघात असा शब्द आहे जो दोन नात्यांना वेगळे करतो.
म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत की, तुमच्या प्रेयसी किंवा पत्नीमध्ये अथवा पती किंवा प्रियकरामध्ये काही बदल तुम्हाला दिसले अथवा जाणवले तर ते तुमची फसवणूक करत आहे अशी दाट शक्यता आहे.

नातेसंबंधांवर विश्वास ठेवणे आणि पारदर्शकता असणे सर्वात महत्वाची आहे. पण जर तुम्हाला तुमच्या प्रेयसीच्या किंवा पत्नीच्या वागण्यात बदल झाला आहे असे वाटू लागले तर ती चिंतेची बाब असू शकते. कधीकधी हे बदल सूचित करतात की ती दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित झाली आहे. येथे आपण अशा संकेताबद्दल चर्चा करु की, आयुष्यात दुसरे कोणी आहे की नाही हे समजण्यास मदत होईल.
1. असाधारण लपून-छपून असेले वर्तन
- तुमचा पार्टनर अचानक फोन आणि सोशल मीडियावर अधिक सतर्क होणे.
- फोनची स्क्रीन लपवणे किंवा फोन उलटा ठेवणे. तुम्हाला तुमच्या मोबाईल किंवा सोशल मीडिया प्रोफाइलपासून दूर ठेवणे.
- हे संकेत काहीतरी लपवत असल्याचे हे लक्षण असू शकते.
हेही वाचा : पुरुषांनो, ध्यानात ठेवा, 40 वर्षांच्या स्त्रियांना त्यांच्या पतीकडून हवी असते 'ही' गोष्ट
2. स्वतःकडे जास्त लक्ष देणे
- जर तुमचा पार्टनर स्वतःच्या कपड्यांबद्दल आणि दिसण्याबद्दल अती जागरूक झाली असेल.
- यापूर्वी कधीही न घातलेले कपडे घालणे.
- बाहेर जाण्यासाठी खूप वेळ आणि मेहनत खर्च करणे.
- हा बदल सूचित करू शकतो की ती दुसऱ्याला प्रभावित करण्याचा प्रयत्न करीत आहे.
3. बोलण्याची अनिच्छा
- तुमच्याशी बोलण्यात रस दाखवत नाही.
- मॅसेजेस आणि कॉलला प्रतिसाद देत नाही. संभाषणात आळशीपणा आणि निष्काळजीपणे प्रतिसाद देणे. त्यांचे लक्ष दुसरीकडे कुठेतरी असल्याची ही चिन्हे असू शकतात.
4. तुमच्यापासून दूर पळणे
- तुमच्यासोबत वेळ घालवणे जाणूनबुजून टाळणे. भावनिकदृष्ट्या दूर राहणे
- कोणत्याही विषयावर तुमच्याशी उघडपणे न बोलणे जर हे सर्व घडत असेल, तर ती तुमच्यातील रस गमावत आहे हे एक मोठे लक्षण आहे.
5. दुसऱ्या व्यक्तीचा वारंवार उल्लेख करणे
- नव्या व्यक्तीची वारंवार स्तुती करणे.
- त्यांच्या सवयी आणि गुणांवर लक्ष केंद्रित करणे.
- विशेषत: तुम्ही ओळखत नसलेल्या एखाद्यासाठी,
- गरज नसलेल्या गोष्टी करणे अथवा त्यांच्या कृतींचे समर्थन करण्यासाठी.
- जर ते असे करत असेल, ते संशय वाढवू शकते.
6. नवीन आवडींमध्ये वेळ घालवणे
- यापुर्वी कधीही दाखवलेल्या नवीन गोष्टींमध्ये स्वारस्य दाखवणे
- नवीन छंद किंवा खाण्याच्या सवयी अंगीकारणे.
- हे देखील शक्य आहे की ती दुसऱ्याची आवड-निवड अमलात आणणे.
टीप: ही माहिती इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या गृहीतकांवर आणि माहितीवर आधारित आहे. वनइंडिया लेखाशी संबंधित कोणतेही इनपुट किंवा माहिती सत्यापित करत नाही. कृपया कोणतीही माहिती आणि गृहितके कृती करण्यापूर्वी किंवा अंमलात आणण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.












Click it and Unblock the Notifications