घुसण्याची भाषा आम्हाला सांगू नका...जरांगे विरुद्ध हाके वाद पेटला; मुंडेंना दिलेल्या धमकीला उत्तर

सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना पोलिस ठाण्यात धमकावल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी थेट मंत्री धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरू न देण्याची धमकी दिली होती. जरांगे यांच्या याच धमकीला आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. जरांगे कोण आहेत? असा सवाल हाके यांनी विचारला. आता धनंजय मुंडे यांच्या धमकीवरुन पुन्हा एकदा जरांगे-हाके वाद पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Lakman Hake

काय होती जरांगे यांची धमकी?

काल बीड येथे मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला होता. ते म्हणाले होते, संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला व त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्या केसाला जरी धक्का लागला तर धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरु देणार नाही. आमचा एक भाऊ गेला. ते आम्ही सहन केलं. आता सहन करणार नाही. मी कुणाचेही नाव घेत नाही. पण देशमुख कुटुंबाला कुणी त्रास दिला तर मराठे कुणालाही रस्त्यावर फिरु देणार नाहीत.

जरांगे यांच्या धमकीची चर्चा

संतोष देशमुख यांची हत्या ९ डिसेंबरला झाली होती. आता या प्रकरणातील जवळपास सर्वच आरोपींना अटक झाली आहे. मात्र आता जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना दिलेल्या धमकीमुळे राज्यात एकच चर्चा सुरु झाली. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात दिसलेला मराठा-ओबीसी संघर्ष पुन्हा दिसण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली.

लक्ष्मण हाके यांचे प्रत्युत्तर

जरांगे यांनी धमकी दिल्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, "काळ 200- 250 वर्षांपुर्वीचा नाही. चितावणीखोर वक्तव्य मनोज जरांगे करत असतील, तर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे, अशा माणसांचा तात्काळ बंदोबस्त करावा. नाहीतर जातीय तेढ निर्माण होईल सामाजिक सुरक्षा धोक्यात येईल आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊन या महाराष्ट्रमध्ये अराजकता निर्माण होईल.

हाके यांचा जरांगे यांना इशारा

पुढे बोलताना हाके म्हणाले की, जरांगे घुसायची भाषा आम्हाला सांगायची नाही. तुमच्यात जर दम असेल ना तर कधी, कुठे, केव्हा, एवढंत त्यांनी सांगावं. महाराष्ट्रातला काट्या कुऱ्हाड्यांचा काळ आता गेला. आताचा काळ हा कायद्याचा, संविधानाचा आणि इथल्या न्यायव्यवस्थेचा आहे. धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरवून द्यायला, कोण आहेत ते जरांगे? जरांगे गुंड आहेत का? जरांगे कुणी एसपी आहेत का? कोण आहेत जरांगे? कायदा यांच्या मालकीचा आहे का? त्यामुळे असल्या चितावणीखोर बोलणं तुमच्या तिकडे कोणालातरी ऐकवा. अशा धमक्या या महाराष्ट्रामध्ये खूप लोकांच्या बघितलेल्या आहेत," अशा कडक शब्दांत लक्ष्मण हाके यांनी प्रत्युत्तर दिले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+