मनोज जरांगे येडपट माणूस... लक्ष्मण हाके यांनी वापरले अपशब्द; मराठा-ओबीसी दोघांचा इशारा काय? वाचा
मनोज जरांगे हा येडपट, खुळचट, बावळट माणूस आहे, अशा शब्दांत टिका करत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या दिवशीच आंदोलन करण्याचा इशारा दिला. मनोज जरांगे पाटील ज्या दिवशी मुंबईत उपोषणाला बसतील, त्याच दिवशी माळेगावच्या खंडोबाला नारळ फोडून आम्हीही मुंबईच्या दिशेने लाँग मार्च काढू, असे लक्ष्मण हाके यांनी आज सांगितले.

मनोज जरांगे यांचा इशारा
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टला मुंबईत आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यापूर्वी सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. मनोज जरांगे म्हणाले, मी २८ ऑगस्टपासून मुंबईत आंदोलन करणार आहे. २८ ऑगस्टला मला सोडवायला मुलं येतील. ते २९ ऑगस्टला माघारी येतील. मुंबईत मी शांततेत आंदोलन करणार आहे. २८ ऑगस्टच्या आत सगळ्या अंमलबजावण्या झाल्या पाहिजेत, असं मनोज जरांगे यांनी सांगितलं.
दोन रथ घेऊन जाणार
मनोज जरांगे पुढे म्हणाले की, मी मुंबईत दोन रथ घेऊन जाणार आहे. एक विजयाचा रथ आणि दुसरा अंतयात्रेचा यथ. या दोन्हीपैकी एक रथ माघारी येईल. हे फडणवीसांनी लक्षात ठेवावं, असा इशारा जरांगे यांनी दिला. सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करावं व आमचा अंत पाहू नये, असे आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी केलं.
काय म्हणाले हाके
मनोज जरांगे पाटील यांनी आज त्यांचा हा निर्णय जाहीर केला. त्यांच्या या निर्णयानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही उपोषणाचा हत्यार उपसलं. याबाबत पत्रकारांशी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की, मनोज जरांगे हा येडपट, खुळचट, बावळट माणूस आहे. त्यामुळे सरकारने आता आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. सत्तेच झुल बाजूला सारून ज्या माणसांनी तुम्हाला निवडून दिले त्यांचा प्रश्न सभागृहात उचलला पाहिजे. शिंदे समितीची माहिती आली आहे, ती खरी असेल तर ओबीसी आरक्षण संपलं आहे. तीच माहिती मी ओबीसी नेत्यांना देत आहे. आठ लाख प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलंय.
हाके यांनी केला आरोप
हाके पुढे म्हणाले की, ओबीसी जाती अजूनही अलिप्त राहताना दिसत आहेत. तिकडे दोन कोटी मराठ्यांनी ओबीसीचे प्रमाणपत्र घेतले आहेत. हे असं असेल तर ओबीसी आरक्षण वाचणार कसं? ओबीसींची घटनात्मक चौकट त्यामुळे ओलंडली गेली आहे. याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं. एवढं सगळं होऊनही ओबीसी नेते आता एक झाले नाहीत तर ते ज्या आरक्षणावर यावेळी निवडून आले पुढच्यावेळी ते निवडून येणार नाहीत.












Click it and Unblock the Notifications