Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

बाबा सिद्दीकींच्या मुलाच्या विरोधात लॉरेन्स बिश्नोईला निवडणूक लढण्याची ऑफर, वाचा कोणी दिली ऑफर!

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धिकी यांच्या हत्येनंतर आता देशभरात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचं नाव पुन्हा चर्चेत आले आहे. सद्या लॉरेन्स गुजरातच्या जेलमध्ये असला तरी तो राजकारणात एंट्री करतो की काय अशी चर्चा रंगली आहे.

त्याचे कारण देखील तसेच आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांचा मुलगा झीशान सिद्दीकी यांच्या जीवाला देखील धोका असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, विधानसभेचे बिगुल वाजल्याने झिशान सिद्दीकी पुन्हा त्यांच्या मतदारसंघातून मैदानात उतरणार आहे. अशातच, झिशान सिद्दीकींच्या विरोधात लॉरेन्स बिश्नोईने देखील निवडणुकीत उतरावे, अशी ऑफर एका पक्षाकडून देण्यात आली आहे.

Lawrence Bishnoi Vs Zeeshan Siddiqui

झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्वमध्ये आमदार!

वांद्रे पूर्व विधानसभा मधून आमदार झिशान सिद्दीकी यांच्याविरोधात लढवण्यासाठी उत्तर भारतीय विकास सेनेकडून लॉरेन्स बिश्नोईला ऑफर आली आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणी लॉरेन्स बिश्नोईच्या काही शूटरला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. अभिनेता सलमान खान यांना जीवे मारण्याची अनेक वेळा धमकी लॉरेन्स बिश्नोईकडून देण्यात आली आहे.

लॉरेन्सला कोणी दिली निवडणुकीची ऑफर?

उत्तर भारतीय विकास सेना हा पक्ष निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगात नोंदणीकृत पक्ष आहे. उत्तर भारतीय विकास सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी लॉरेन्स बिश्नोईला पत्र लिहून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक लढवण्याची मागणी केली आहे. बाबा सिद्दीकी देशभक्त नाही, लॉरेन्स बिश्नोई देशभक्त आहे. तर लॉरेन्स बिश्नोई हा उत्तर भारतीय समाजाचा आहे. बिश्नोईमध्ये आम्हाला शहीद भगत सिंग दिसतो. त्यामुळे निवडणूक लढवण्यासंदर्भात विचार करावा, अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+