Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'लाडकी बहिण' योजनेचा हप्ता रखडला!'या' महिलांना मिळणार नाही दीड हजार, काय कारणं आहेत? वाचा

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र लाडकी बहिण योजनेच्या नोव्हेंबर महिन्याच्या 1,500 रुपयांच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. नियमांमधील कठोर पडताळणी आणि आता E-KYC च्या अनिवार्यतेमुळे अनेक महिलांना या महिन्याचा लाभ मिळणार नाही. वयोमर्यादेमुळे काही महिलांना वगळण्यात आले आहे. याशिवाय, E-KYC आणि आधार सिडिं पूर्ण न केलेल्या महिलांचा हप्ताही रखडणार आहे. तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यासाठी कोणते निकष पूर्ण करणे आवश्यक आहे, हे सविस्तर जाणून घ्या.

Ladki Bahin Yojana

हप्ता थांबण्याची मुख्य कारणे: E-KYC आणि अपात्रता

नोव्हेंबर 2025 महिन्यातील दीड हजार रुपयांचा हप्ता खालील दोन प्रमुख कारणांमुळे थांबणार आहे.

पहिले म्हणजे पडताळणीत अपात्र ठरलेल्या महिला : योजनेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या महिलांना हप्ता मिळणार नाही.

वयाची मर्यादा: या योजनेचा लाभ फक्त 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी आहे.

65 वर्षे पूर्ण झालेल्या महिलांना तत्काळ अपात्र घोषित केले आहे. सध्या सुमारे 1 लाख 20 हजार महिलांना या कारणास्तव वगळले आहे.

21 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या महिलांनाही लाभ मिळणार नाही.

आर्थिक निकषामुळे लाभ मिळणार नाही ..

ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, त्या अर्जदार महिलांना लाभ मिळणार नाही.

ज्या कुटुंबात चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळता) आहे.

एकाच कुटुंबातील दोन महिलांना लाभ मिळणार नाही.

सरकारी कर्मचारी असलेल्या कुटुंबातील महिला.

ज्या महिलांना आधीच इतर मोठ्या सरकारी योजनांचा लाभ मिळत आहे.

लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे बंधनकारक आहे. ती जर नसेल तर लाभ मिळणार नाही.

तांत्रिक आणि बँक खात्यातील त्रुटींमुळे हप्ता जमा होण्यास थेट अडथळा येतो. हेही एक कारण लाभ न मिळण्यामागे असू शकतो.

E-KYC अनिवार्य:

योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थी महिलेचे E-KYC पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या महिलांनी अजूनही E-KYC केले नाही, त्यांना हप्ता मिळणार नाही.

आधार सिडिंग : अर्जदार महिलेचे स्वतःचे बँक खाते असणे आणि ते खाते आधार कार्डशी जोडलेले (Aadhaar Seeding) असणे अनिवार्य आहे.

आधार सिडिंग किंवा बँक खाते DBT (Direct Benefit Transfer) साठी सक्रिय नसले तरी तुमचा हप्ता रखडू शकतो.

लाभार्थ्यांसाठी तातडीची सूचना

ज्या महिलांनी अजूनही E-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी तात्काळ नजीकच्या केंद्रावर जाऊन ती पूर्ण करावी. तसेच, आपले बँक खाते आधार कार्डशी सिडकेलेले आहे आणि DBT साठी सक्रिय आहे, याची खात्री करून घ्यावी. पडताळणी मोहीम सुरूच असल्याने, अपात्र ठरलेल्या महिलांवर नियमानुसार कारवाई केली जाऊ शकते, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+