मोठी बातमी! आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार, मंत्री आदिती तटकरे काय म्हणाल्या वाचा
Ladki Bahin Yojana installment : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता आजपासून देण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता हप्ता कधी मिळणार याची वाट पाहणाऱ्या लाभार्थ्यांची प्रतिक्षा संपली आहे.

लाडक्या बहिणींना आजपासून त्यांच्या आधार संलग्गित बँक खात्यात ऑगस्ट महिन्याचा दीड हजार रुपयांचा हप्ता वितरण करण्यास सुरवात झाली आहे. आता लाभार्थ्यांनी फक्त मोबाईलवरील एसएमएसची वाट पाहायची आहे. एसएमएस आला की खात्यात पैसे जमा झाले हे समजावे. ज्यांना एसएमएस नाही आला त्यांनी इतर माध्यमांतून खात्यात पैसे जमा झाले की नाही हे तपासून घेण्यास हरकत नाही.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती !
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) September 11, 2025
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आज पासून सुरुवात होत आहे.
महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली… pic.twitter.com/oRnOcQxuzP
काय म्हणाल्या एक्सवरील पोस्टमध्ये आदिती तटकरे?
आपल्या ए्क्सवरील अकाऊंटवर केलेल्या पोस्टमध्ये मंत्री आदिती तटकरे यांनी नमूद केले की, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आज पासून सुरुवात होत आहे. महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे."
लाडक्या बहिणींनो खात्यात पैसे जमा झाले की नाही हे कसे तपासायचे?
लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. पात्र महिलांच्या बँक खात्यावर हे पैसे पाठवले जातात. खालील पद्धतीने तुम्ही बँक खात्यात पैसे आले की नाही, हे तपासू शकता.
1) तुम्ही तुमच्या बँकेच्या कस्टमर केअरला कॉल करून तुमच्या बँकेत जमा झालेली रक्कम विचारू शकता.
2) तुम्ही ऑनलाईन बँकिंग किंवा बँकेच्या App च्या माध्यमातून बँक स्टेटमेंट डाऊनलोड करून तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले आहेत की नाही? हे तपासू शकता.
3) तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले असतील तर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर तुम्हाला मेसेज येईल. हा मेसेज आलेला आहे का? ते चेक करा
4) तुम्ही ऑनलाईन बँकिंग वापरत नसाल तर प्रत्यक्ष बँकेत जाऊनही तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत की नाही, हे तपासू शकता.
हेही वाचा : लाडकी बहिण योजनेतील लाखो अपात्र लाभार्थ्याचा निर्णय भाऊ-दादाच्या हाती! मंत्री म्हणाल्या कारवाई होणार












Click it and Unblock the Notifications