Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

लाडकी बहिण योजनेतील लाखो अपात्र लाभार्थ्याचा निर्णय भाऊ-दादाच्या हाती! मंत्री म्हणाल्या कारवाई होणार

Ladki bahin Yojana : महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत काही सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांनी घुसखोरी केल्याचे दिसून आले तर काही पुरुषांसह अपात्र व्यक्तींनी या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. त्यानंतर सरकारी पातळीवर पडताळणी सुरु झाली आणि 26 लक्ष लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करुन दिली आहे.

आता या २६ लाख अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई होणार असल्याबद्दल थेट राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सवर पोस्ट करुन माहिती दिली आहे.

Ladki bahin Yojana

मंत्री आदिती तटकरे यांच्या एक्सवरील पोस्टनुसार, "छाननीअंती जे लाभार्थी अपात्र ठरतील त्यांच्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य कारवाई करण्यात येईल." असे स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे अपात्र लाभार्थ्यांच्या योजनेतील भवितव्याबाबत आणि कारवाई बाबतचा निर्णय लाडक्या बहि‍णींचे दोन भाऊ आणि एक दादा अशा तिघांवर अवलंबून आहे.

Take a Poll

आदिती तटकरे यांची एक्स पोस्ट काय?

राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मिडिया साईट एक्सवरील त्यांच्या अकाऊंटवर एक पोस्ट केली. त्यात म्हटले आहे की, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थींपैकी सुमारे 26 लक्ष लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करुन दिली होती. सदर सुमारे 26 लक्ष लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आहेत."

'अपात्र महिलांची होतेय सुक्ष्म छाननी..'

मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले की, माहिती व तंत्रज्ञान विभागाने उपलब्ध करुन दिलेली सदर लाभार्थ्यांची ही प्राथमिक माहिती महिला व बालविकास विभागाने सदर संबंधित जिल्हा यंत्रणेला छाननीसाठी (Physical Verification) उपलब्ध करुन दिलेली आहे. त्यानुसार हे लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात किंवा नाही याबाबतची सुक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावर सुरु आहे. छाननीअंती या लाभार्थींची पात्रता/अपात्रता स्पष्ट होणार आहे."

'अपात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांवर कारवाई'- आदिती तटकरे

आदिती तटकरे यांनी पोस्टमध्ये पुढे नमूद केले की, "छाननीअंती जे लाभार्थी अपात्र ठरतील त्यांच्याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य कारवाई करण्यात येईल, तसेच पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांचा लाभ यापुढेही पुवर्वत सुरु राहील."

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+