लाडकी बहिण योजनेची रक्कम बँक खात्यात आली की नाही; हे कसे तपासायचे? जाणून घ्या 4 सोप्या पद्धती
Ladki Bahin Yojana How to check amount : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेने नव्या वर्षात पदार्पण केले आहे. ही योजना सुरु राहणार की, बंद होणार यासंदर्भात अनेक समज-गैरसमज तयार झाले होते. आता राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता देणे सुरु झाले आहे. त्यानुसार लाखो महिलांच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे काही महिलांच्या खात्यात पैसेच आले नाही. त्यामुळे 1 फेब्रुवारीपर्यंत काही महिलांना पैसे येतील.
सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. जुलै महिन्यापासून या योजनेचा लाभ देण्यास सुरुवात झालेली आहे. पहिल्या टप्प्यात 14 ऑगस्टपासून महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये दिले, त्यानंतर ही योजना विधानसभा निवडणूक काळातही थांबली नाही.

लाडकी बहिण योजनेचे 2100 रुपये कधीपासून येणार हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरीही येत्या फेब्रुवारी महिन्यापासून योजनेत वाढीव रक्कम मिळेल असा अंदाज आहे. पण जानेवारी 2025 महिन्याचे पैसे काही महिलांना खात्यात आले की नाही हे त्यांना कळत नाही. अशा अनेक महिला फारशा शिक्षित नसल्याने त्यांना इतरांवर अवलंबून राहावे लागते. पैसे आले की नाही हे कसे समजेल हे आपण चार गोष्टीतून समजून घेणार आहोत.
खात्यात पैसे आले की नाही, कसे चेक करावे?
लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. पात्र महिलांच्या बँक खात्यावर हे पैसे पाठवले जातात. खालील पद्धतीने तुम्ही बँक खात्यात पैसे आले की नाही, हे तपासू शकता.
1) तुम्ही तुमच्या बँकेच्या कस्टमर केअरला कॉल करून तुमच्या बँकेत जमा झालेली रक्कम विचारू शकता.
2) तुम्ही ऑनलाईन बँकिंग किंवा बँकेच्या अॅपच्या माध्यमातून बँक स्टेटमेंट डाऊनलोड करून तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले आहेत की नाही? हे तपासू शकता.
3) तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले असतील तर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर तुम्हाला मेसेज येईल. हा मेसेज आलेला आहे का? ते चेक करा
4) तुम्ही ऑनलाईन बँकिंग वापरत नसाल तर प्रत्यक्ष बँकेत जाऊनही तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत की नाही, हे तपासू शकता.












Click it and Unblock the Notifications