Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Ladki Bahin Yojana या महिलांना मिळणार नाही लाडकी बहिण योजनेचा हप्ता! लाभ मिळाला की नाही, कसे समजायचे

Ladki Bahin Yojana How to Check 1500 has been received in the account or not : राज्य सरकारने ११ सप्टेंबर २०२५ पासून लाडकी बहिण योजनेचा दीड हजार रुपयांचा हप्ता देण्यास सुरुवात केली आहे. अनेक महिलांना ही रक्कम मिळत आहे तर दुसरीकडे बऱ्याच महिलांच्या खात्यात योजनेचे दीड हजार रुपये आलेले नाहीत. अशा महिलांना हप्ता का मिळाला नाही याची आता त्या चाचपणी आणि पडताळणी करत आहेत.

राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी काल एक्सवर पोस्ट करत लाडक्या बहि‍णींना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरीत केला जात असल्याचे सांगितले. मात्र, अनेक महिलांच्या खात्यात पैसे आले हे त्यांनाच माहित नाही, तर अनेकींनी पडताळणी केली तरीही त्यांना पैसे आले नाही हे दिसून आले, त्यामुळे आपण या दोन्ही गोष्टी कशा तपासायच्या हे जाणून घेऊया.

Ladki Bahin Yojana

पात्रता काय आहेत?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील महिला अर्ज करू शकतात. या योजनेत अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी लागते आणि तिचे स्वतःचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे.

लाडक्या बहिणींनो खात्यात पैसे जमा झाले की नाही हे कसे तपासायचे?

लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. पात्र महिलांच्या बँक खात्यावर हे पैसे पाठवले जातात. खालील पद्धतीने तुम्ही बँक खात्यात पैसे आले की नाही, हे तपासू शकता.

1) तुम्ही तुमच्या बँकेच्या कस्टमर केअरला कॉल करून तुमच्या बँकेत जमा झालेली रक्कम विचारू शकता.

2) तुम्ही ऑनलाईन बँकिंग किंवा बँकेच्या App च्या माध्यमातून बँक स्टेटमेंट डाऊनलोड करून तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले आहेत की नाही? हे तपासू शकता.

3) तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले असतील तर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर तुम्हाला मेसेज येईल. हा मेसेज आलेला आहे का? ते चेक करा

4) तुम्ही ऑनलाईन बँकिंग वापरत नसाल तर प्रत्यक्ष बँकेत जाऊनही तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत की नाही, हे तपासू शकता.

कुणाला मिळणार नाही योजनेचा लाभ अन् हप्ता?

राज्य सरकारने लाडकी बहिण योजनेत जे निकष लागू केले आहेत, ते जर लाभार्थी पुर्ण करत नसेल तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. जर पडताळणीत पात्रता पुर्ण नसेल किंवा अलिकडच्या काळात अपात्र ठरत असेल तर योजनेचा लाभ मिळणार नाही.

1. "ही योजना 21 ते 65 वयोगटातील महिलांनाच लागू असल्याने पडताळणीच्या अपडेटनुसार, 65 वर्षे पूर्ण करणाऱ्या महिलांना अपात्र घोषित केले जाते. त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या नियमितपणे बदलत असते. सध्या, वयोमर्यादा ओलांडल्यानंतर सुमारे 1 लाख 20 हजार महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. म्हणजेच जर 65 वर्ष पुर्ण झाली असतील तर अशा महिलांना योजनेतून वगळण्यात येते.

2. लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे बंधनकारक आहे, जर लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी नसेल तर अशांना लाभ मिळणार नाही.

3. अर्जदार महिलेचे स्वतःचे बँक खाते असणे आणि ते आधार कार्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे, जर नसेल तर तुमचा हप्ता रखडू शकतो आणि तुम्हाला आवश्यक ती कार्यवाही करावी लागेल.

4. एकाच कुटुंबातील दोन महिलांना लाभ मिळणार नाही.

5.जर महिला किंवा कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांवर असेल तर अशा महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+