आनंदाची बातमी : 'या' दिवशी मिळणार फेब्रुवारीचा हप्ता; लाडक्या बहिणींसाठी सरकारचं डबल गिफ्ट
लाडकी बहिण योजना ही राज्यातील सर्वाधिक चर्चेची योजना ठरली आहे. लाडकी बहिण योजनेनेच महायुती सरकारला दुसऱ्यांदा सत्तेवर आणलं. लाडकी बहिण योजनेतून अडीच लाखांच्या आत उत्पन्न असणाऱ्या महिलांना दीड हजार रुपये दिले जातात. जुलै २०२४ पासून या योजनेची अंमलबजावणी झाली. आत्तापर्यंत लाडकी बहिण योजनेचे सात हप्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले. मात्र अजून आठवा म्हणजेच फेब्रुवारीचा हप्ता मिळालेला नव्हता. आता याच हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

फेब्रुवारीचा हप्त्याला उशीर
महायुती सरकारने आत्तापर्यंत या योजनेचे सात हप्ते वेळेवर जमा केले आहेत. मात्र फेब्रुवारीचा आठवा हप्ता उशीरा येत आहे. हा हाप्ता वेळेत जमा होणार होता. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे हाप्ता मिळण्यास विलंब झाला. राज्याच्या वित्त विभागाकडून आठव्या हाप्त्यासाठी महिला आणि बालविकास विभागाला 3490 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे आता लवकरच फेब्रुवारीचा हाप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे.
कधी मिळणार फेब्रुवारीचा हप्ता?
सोमवारपासून म्हणजे तीन मार्चपासून फेब्रुवारीचा हाप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होऊ शकते, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता या महिन्यात फेब्रुवारीचे दीड हजार आणि चालू महिन्याचे दीड हजार रुपये असे एकूण तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना मिळण्याची शक्यता आहे.
2100 रुपये कधी मिळणार?
लाभार्थी महिलांना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देऊ, अशी घोषणा विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीकडून करण्यात आली होती. आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे, त्यामुळे आता 2100 रुपये कधी मिळणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर हा वाढीव हाप्ता लाभार्थी महिलांना मिळण्याची शक्यता आहे.
-
Eid mubarak 2026 wishes marathi : आपल्या जोडीदाराला पाठवा 'हे' रोमँटिक ईद शुभेच्छा संदेश आणि शायरी! -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
सोनं झालं स्वस्त! युद्धाच्या काळातही दरात 'एवढ्या' हजारांची ऐतिहासिक घसरण; खरेदी करावं की थांबावं? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी






Click it and Unblock the Notifications