Ladki Bahin Yojana: 35 ते 40 लाख लाडक्या बहिणी होऊ शकतात अपात्र; 'हे' मोठे कारण, हप्ता थांबणार? वाचा
Ladki bahin yojana e kyc pending : राज्य सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेली 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' आता एका महत्त्वाच्या टप्प्यावर आली आहे. मात्र, राज्यातील सुमारे ४० लाख महिलांची ई-केवायसी (e-KYC) अद्याप पूर्ण झाली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे या महिलांना मिळणारा मासिक हप्ता बंद होण्याची किंवा त्या कायमच्या अपात्र ठरण्याची भीती निर्माण झाली आहे.

प्रशासनाकडून 'डेडलाईन' जारी
राज्यातील लाखो महिलांचे अर्ज केवळ केवायसी अभावी प्रलंबित आहेत. नवीन वर्षाच्या (२०२६) सुरुवातीपूर्वी हे अर्ज निकाली काढण्यासाठी सरकारने जिल्हाधिकारी कार्यालयांना कडक 'डेडलाईन' दिली आहे. ज्या महिलांचे केवायसी पूर्ण होणार नाही, त्यांचे नाव पात्र यादीतून वगळले जाऊ शकते, असे संकेत प्रशासनाने दिले आहेत अशी सुत्रांची माहिती आहे.
लाडकी बहीण योजनेशी संबंधित ५ महत्त्वाच्या घडमोडी
१. प्रलंबित अर्जांचा वेगवान निपटारा
ई-केवायसी रखडलेल्या महिलांच्या घरी जाऊन किंवा अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. ३१ डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
२. हप्त्यात वाढ होण्याची शक्यता!
नवीन वर्षात वाढती महागाई पाहता, लाडकी बहीण योजनेच्या १५०० रुपयांच्या हप्त्यात वाढ करण्याबाबत सरकार दरबारी हालचाली सुरू आहेत. आगामी मंत्रिमंडळ बैठकीत यावर मोठा निर्णय होऊ शकतो.
३. बँक खाते आणि डीबीटी समस्या
अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज येतो, मात्र प्रत्यक्षात पैसे दिसत नाहीत. अशा महिलांनी बँकेत जाऊन आपले खाते आधारशी लिंक करून 'डीबीटी' सक्रिय करणे अनिवार्य आहे.
४. नवीन नाव नोंदणीसाठी पोर्टल
अद्याप या योजनेपासून वंचित असलेल्या महिलांसाठी सरकार पुन्हा एकदा नवीन पोर्टल सुरू करण्याचा विचार करत आहे, जेणेकरून सुटलेल्या पात्र भगिनींना अर्ज करता येईल.
५. यशोगाथा आणि गौरव
या योजनेच्या पैशातून स्वतःचा छोटा व्यवसाय किंवा उद्योग सुरू करणाऱ्या महिलांचा जिल्हास्तरावर सत्कार केला जाणार आहे. त्यांच्या यशोगाथा इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठराव्यात, असा सरकारचा मानस आहे.
(सूचना : वरील बातमी उपलब्ध माहिती आणि प्रशासकीय निर्णयांच्या संदर्भावर आधारित आहे. लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांना अधिकृत माहितीसाठी 'नारीशक्ती दूत' ॲप किंवा संबंधित तहसील कार्यालयाशी संपर्क साधाता येईल.)












Click it and Unblock the Notifications