Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ब्रेकिंग! लाडकी बहिण योजनेची e-KYC पुन्हा सुरु! आदिती तटकरेंनी सांगितली 'ही' शेवटची तारीख

Ladki Bahin Yojana e-KYC : लाखो लाभार्थी असलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना' (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) मध्ये पारदर्शकता आणि सुसूत्रता आणण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अनिवार्य केली आहे.महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे.

Ladki Bahin Yojana e-KYC

ई-केवायसी करा, आदिती तटकरे यांचे आवाहन

आदिती तटकरे यांनी 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) या समाज माध्यमावर पोस्ट करून, ज्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी केली नाही अशा सर्व उर्वरित लाभार्थी भगिनींना १८ नोव्हेंबर २०२५ पूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. ई-केवायसी न केल्यास पुढील हप्ते थांबण्याची शक्यता असल्याने ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे.

ई-केवायसीची अंतिम मुदत जाहीर

पारदर्शकतेसाठी e-KYC सक्तीचेलाडकी बहिण योजनेत लाभार्थ्यांना नियमित आणि योग्य व्यक्तींनाच आर्थिक लाभ मिळावा यासाठी ई-केवायसीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी काल (२८ ऑक्टोबर २०२५) मंत्रालयात या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत बैठक घेतली.

Take a Poll

तटकरे म्हणाल्या, 'या' वेबसाईटवर ईकेवायसी करा

मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या 'X' पोस्टमध्ये माहिती दिली की, "दिनांक १८ सप्टेंबर २०२५ पासून https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर e-KYC सुविधा उपलब्ध आहे. यासाठी २ महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. उर्वरित लाभार्थी भगिनींनीही १८ नोव्हेंबर २०२५ पूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी."हा निर्णय योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना वगळून, गरजू आणि पात्र महिलांनाच मदत मिळावी या उद्देशाने घेण्यात आला आहे.

ई-केवायसी (e-KYC) कुठे आणि कशी करायची? (सोपी पद्धत)

लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिला खालीलप्रमाणे सोप्या पद्धतीने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

१. अधिकृत संकेतस्थळ: सर्वप्रथम योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या: https://ladakibahin.maharashtra.gov.in](

२. ई-केवायसी पर्याय निवडणे: वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर (Homepage) 'ई-केवायसी' (e-KYC) किंवा 'आधार संलग्नता' असा पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करा.

३. आधार क्रमांक व पडताळणी: तुमचा आधार क्रमांक आणि योजनेचा नोंदणी क्रमांक (Registration Number) योग्य ठिकाणी भरा.त्यानंतर, 'सबमिट' बटणावर क्लिक केल्यावर, तुमच्या आधारशी संलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी (OTP) येईल.

४. प्रक्रिया पूर्ण करणे: हा ओटीपी दिलेल्या बॉक्समध्ये टाकून पडताळणी (Verify) करा. एकदा पडताळणी यशस्वी झाल्यास, तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल आणि तुम्हाला मोबाईलवर संदेश मिळेल.

(टीप: ज्या महिलांना ही प्रक्रिया स्वतः करणे शक्य नसेल, त्यांनी जवळच्या महा-ई-सेवा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र येथे जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी.)

आदिती तटकरे यांची पोस्ट

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी e-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयात बैठक घेतली.

दिनांक १८ सप्टेंबर २०२५ पासून https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर e-KYC सुविधा उपलब्ध आहे. यासाठी २ महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. उर्वरित लाभार्थी भगिनींनीही १८ नोव्हेंबर २०२५ पूर्वी e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी असे मी सर्वांना आवाहन करते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+