Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

महत्वाची बातमी! लाडकी बहिण योजनेच्या ई-केवायसीची तारीख वाढली की नाही? वाचा लवकर करा 'ही' प्रक्रिया

Ladki Bahin Yojana e-KYC Deadline : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'लाडकी बहिण योजने'च्या सर्व पात्र लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. योजनेचा पुढील हप्ता सुरळीत मिळवण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत महत्वाची आहे. सरकारतर्फेही ईकेवायसी करण्याची सूचना दिली असून ज्यांनी अद्याप ईकेवायसी केली नाही अशा लाभार्थ्यांनी ईकेवायसी लवकर करणे आवश्यक आहे.

Ladki Bahin Yojana e-KYC Deadline

राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी काही दिवसांपुर्वीच स्वतः या संदर्भात आपल्या एक्स (X) या समाज माध्यमावर पोस्ट करत माहिती दिली आहे. ज्या लाभार्थी भगिनींनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांना तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.

ईकेवायसीची तारीख किती आहे?

राज्य सरकारने आज १५ नोव्हेंबरपर्यंत ईकेवायसीची तारखेत कोणताही बदल केलेला नाही. लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यींना ईकेवायसीसाठी १८ नोव्हेंबर २०२५ ही तारीख असून स्वतः मंत्री आदिती तटकरे यांनी या तारखेच्या आत ईकेवायसी करण्याचे आवाहन केले आहे, त्यामुळे ईकेवायसीसाठी केवळ तीन दिवस शिल्लक आहेत.

ई-केवायसी अपडेट न केल्यास काय होईल?

मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की, या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे.

हप्ता थांबणार का? : ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या लाभार्थींना योजनेच्या पुढील किश्त मिळण्यास बाधा येऊ शकते किंवा ती थांबवली जाऊ शकते अशी शक्यता आहे मात्र हा निर्णय अंतीमः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील.

का करायची ईकेवायसी? : या अनिवार्यतेचा मुख्य उद्देश असा आहे की, योजनेचा वित्तीय लाभ केवळ योग्य आणि पात्र महिलांपर्यंतच पोहोचावा आणि अपात्र लाभार्थ्यांना वगळता यावे यासाठी ईकेवायसी करणे आवश्यक आहे म्हणजेच आपोआप अपात्र लाभार्थी या योजनेतून वगळले जातील.

८ ऑक्टोबर २०२५ रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत या प्रक्रियेवर चर्चा झाली होती. ई-केवायसीची सुविधा १८ सप्टेंबर २०२५ पासून अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली होती, ज्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता.

ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची सोपी पद्धत (Steps to Complete e-KYC)

  • लाभार्थी महिला खालील सोप्या टप्प्यांचे पालन करून आपली ई-केवायसी प्रक्रिया घरी बसून पूर्ण करू शकतात.
  • सर्वात प्रथम, योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा: https://ladakibahin.maharashtra.gov.in
  • होमपेजवर 'ई-केवायसी' किंवा 'आधार संलग्नता' चा पर्याय निवडा.
  • तुमचा आधार क्रमांक आणि योजनेचा नोंदणी क्रमांक योग्य ठिकाणी अचूकपणे भरा.
  • 'सबमिट' बटणावर क्लिक केल्यानंतर, तुमच्या आधारशी जोडलेल्या मोबाइल क्रमांकावर एक ओटीपी (OTP) प्राप्त होईल.
  • प्राप्त झालेला ओटीपी दिलेल्या बॉक्समध्ये टाकून क्लिक करा.
  • ही प्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर, तुम्हाला मोबाइलवर पुष्टीकरण संदेश मिळेल.

टीप -ज्या महिलांना ही प्रक्रिया स्वतः करणे शक्य नसेल, त्या जवळच्या महा-ई-सेवा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र येथे जाऊन मदत घेऊ शकतात. १८ नोव्हेंबर २०२५ पूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+