Ladki Bahin:लाडक्या बहिणींच्या अर्जाची अंगणवाडी सेविका करणार घरोघरी जाऊन पडताळणी! विचारणार हे प्रश्न
Ladki Bahin Yojana : राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने ची लोकप्रियता शिखरावर आहे आणि या योजनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या योजनेचा तेरावा हप्ता म्हणजेच जुलैचे दीड हजार रुपये नुकतेच लाभार्थ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आले आहेत, परंतु जवळपास 42 लाख लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता मिळालेला नाही, त्यामुळे या योजनेतील लाभार्थ्यांमध्ये आपले नाव वगळले तर नाही ना याची चिंता आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये काही बोगस लाभार्थ्यांनी शिरकाव केला होता, त्यानंतर काही सरकारी कर्मचाऱ्यांचाही या योजनेत सहभाग आढळून आला तसेच काही पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले. या काळातच राज्याचा महिला आणि बालकल्याण विभागाने तत्परता दाखवली आणि आयकर विभागाच्या मदतीने त्यांनी लाडकी बहीण योजनेची पडताळणी सुरू केली.

बोगस लाभार्थी उघड
लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीनंतर बोगस लाभार्थी या योजनेत असल्याचे उघड झाले. दरम्यान, सरकारी कर्मचाऱ्यांचे आणि ज्यांनी लाभ घेतला अशा बोगस लाभार्थ्यांकडून पैसे वसूल केले जाईल असे नुकतेच सरकारकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांमध्ये आपले नाव वगळले की आहे यासंदर्भात अनेक संभ्रम आहेत.
42 लाख महिलांना मिळाला नाही हप्ता!
साम टीव्हीच्या वृत्तानुसार, लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता जवळपास 42 लाख महिलांना मिळालेला नाही, तर दुसरीकडे अशी माहिती आहे की या योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. म्हणजे अद्यापही लाडक्या बहिणींची बहिणींच्या अर्जांची पडताळणी सुरू आहे.
अंगणवाडी सेविका करणार लाडक्या बहिणींच्या अर्जाची पडताळणी
मिडिया रिपोर्टनुसार, लाडक्या बहिणींच्या अर्जाची पडताळणी अंगणवाडी सेविका करणार आहेत. लाडकी बहीण योजनेमध्ये आता पडताळणी दरम्यान अंगणवाडी सेविका लाभार्थ्यांना काही प्रश्न विचारणार आहेत. अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन महिलांच्या अर्जाची छाननी करणार आहे आणि त्यांना प्रश्न विचारणार आहेत.
काय विचारणार अंगणवाडी सेविका प्रश्न?
- घरोघरी जाऊन पडताळणी करणाऱ्या अंगणवाडी सेविका या महिलांना तुमच्याकडे चारचाकी वाहन आहे का?
- तुम्ही आयकर भरता का?
- घरातील कोणतीही व्यक्ती आयकर भरते का?
- तुमच्या घरातील किती महिलांनी लाडके बहिणी योजनेचा लाभ घेतला आहे?
- तुमचे वार्षिक उत्पन्न किती आहे?
- महाराष्ट्राची रहिवासी असल्याचा पुरावा आहे का वय किती आहे? असे काही प्रश्न विचारतील.
प्राप्त माहितीनुसार, जर लाभार्थी योजनेत पात्र नसेल तर त्याला मिळणारे लाभ बंद होऊ शकतात अशी शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications