लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार?; अजित पवारांनी सांगितली तारीख; पुण्यात केले मोठे वक्तव्य!
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राजकारणात सध्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या योजनेच्या हप्त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगला असून, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी यावर महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे.

16 तारखेला मिळणार पैसे? अजित पवारांची भूमिका!
मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे एकत्रित ३००० रुपये देण्याची तयारी महायुती सरकारने केली होती.
मात्र, काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहून हे पैसे १४ जानेवारीनंतर देण्याची मागणी केली आहे. यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले-"निवडणूक आयोगाने तसे निर्देश दिले, तर आम्ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता १६ तारखेला देऊ. प्रशासकीय आणि कायदेशीर बाबी तपासूनच पुढील निर्णय घेतला जाईल."
राजकीय वाद: महायुती विरुद्ध काँग्रेस
भाजपचा प्रचार: गिरीश महाजन आणि तेजस्वी घोसाळकर यांसारख्या नेत्यांनी सोशल मीडियावर ३००० रुपये मिळणार असल्याच्या पोस्ट शेअर करून प्रचारात आघाडी घेतली होती. काँग्रेसने आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ते योजनेच्या विरोधात नाहीत, परंतु निवडणुकीच्या काळात मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी या वेळेचा वापर केला जाऊ नये. नाशिकच्या सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत 'देवभाऊ' मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही. तसेच ५० लाख लखपती दीदींची संख्या १ कोटीवर नेण्याचे उद्दिष्ट त्यांनी व्यक्त केले.
'रॉकी भाई' व युती धर्मावर दादांची मिश्किल टिप्पणी
रोहित पवार यांनी केलेल्या 'रॉकी भाई' या उल्लेखावर दादा म्हणाले, "मी अद्याप 'केजीएफ' पाहिला नाही. तो सिनेमा पाहिल्यानंतरच रोहितने मला दिलेली उपमा योग्य आहे की नाही, हे ठरवेन." देवेंद्र फडणवीस यांना उत्तर देताना ते म्हणाले की, महापालिका निवडणुकीत स्थानिक समस्या मांडणे म्हणजे युती धर्म मोडणे नव्हे. ९ वर्षे निवडणुका झाल्या नसल्याने लोकांचा आवाज (कंठ) फुटणे स्वाभाविक आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यावर टीका करताना दादा म्हणाले की, ते स्वयंभू आहेत आणि भोसरीतील लोक कोणाच्याही सांगण्यावरून चालत नाहीत.












Click it and Unblock the Notifications