2100 रुपये सोडाच आता 1500 रुपयावरुन लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपये मिळणार, का घेतला असा निर्णय?
Ladaki Bahin Yojana Update News : महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात लाडकी बहीण योजना आणली. या योजनेमुळे विधानसभेत महायुतीला भरभरून यश देखील मिळाले. या योजनेच्या लाभातून पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा करण्यात येतात. तर आगामी काळात 2100 रुपये दिले जातील, अशी घोषणा देखील नेत्यांनी केलेली आहे.
अशातच या योजनेतील सुमारे 8 लाख लाभार्थी बहिणींना आता राज्यसरकारडून मोठा दणका देण्यात आला आहे. सुमारे 8 लाख लाभार्थी महिलांना 2100 रुपये सोडूनच द्या, 1500 रुपये देखील नाही मिळणार, तर त्यांना आता फक्त 500 रुपयांवर बोळवण केली जाणार आहे, शासनाने हा निर्णय का घेतला याची माहिती समोर आलेली आहे. परंतु, या निर्णयामुळे आता लाडक्या बहिणींमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.

नेमका प्रकार काय आहे?
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या अनेक महिलांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आधीच लाभ मिळतोय. राज्यातील अशा महिलांची आकडेवारी साधारण 8 लाख इतकी आहे. अशा महिलांना आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1,500 रुपयांऐवजी 500 रुपये मासिक मिळणार आहेत.
नमो शेतकरी योजनेतून 1 हजार रुपये मिळत असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेच्या नियमानुसार लाभार्थ्यांना इतर सरकारी योजनांचा लाभ घेता येईल. पण त्यांचा एकूण मासिक लाभ 1 हजार 500 रुपयांपर्यंत मर्यादित राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
निवडणुकीआधी सरसकट लाभ नंतर लागली कात्री
विधानसभा निवडणुकीआधी लाडकी बहीण योजना सुरु झाली. तेव्हा महिलांना सरसकट लाभ देण्यात आला होता. यात पात्र, अपात्र अशा दोन्ही प्रकारच्या महिलांनी अर्ज केले. पण विधानसभा निवडणुकीनंतर राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ मिळणाऱ्या महिलांची कागदपत्र पडताळणी केली. यातून अपात्र ठरलेल्या महिलांना योजनेच्या लाभातून वगळले. आता पात्र व्यक्तींनाच महिलांना दीड हजारांचे मानधन मिळत आहे.
ऑक्टोबर-2024 मध्ये किती आले होते अर्ज?
ऑक्टोबरमध्ये या योजनेसाठी 2.63 कोटी अर्ज आले होते. तपासणी प्रक्रियेनंतर ही संख्या 11 लाखांनी कमी झाली. त्यामुळे फेब्रुवारीपर्यंत 2.52 कोटी महिला लाभार्थ्यांना योजनेचे पैसे मिळाले. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये अंतिम स्टायपेंड 2.46 लाख लाभार्थ्यांना देण्यात आला. यातूनही आता नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्यांना 1500 रुपयाऐंवजी फक्त 500 रुपये मिळणार आहेत.












Click it and Unblock the Notifications