राज्यात विक्रमी मताधिक्य कुणाला..? अजित पवारांच्या 'या' पठ्ठ्याने केला विक्रम

Maharashtra Assembly Election Result 2024- अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघात अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट अशी लढत रंगली. या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून विद्यमान आ. आशुतोष काळे निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांच्याविरोधात शरद पवार गटाने संदीप वर्पे यांना रिंगणात उतरवले होते. नियोजनबद्ध प्रचार, केलेली विकासकामे आणि भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे व विवेक कोल्हे यांची साथ या बळावर आ. आशुतोष काळे यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवला.

Ashutosh Kale

आ. काळे यांचा विक्रमी विजय

आ. आशुतोष काळे यांना एकूण एक लाख 61 हजार 147 मते मिळाली. तर विरोधी शरद पवार गटाच्या संदीप वर्पे यांना अवघ्या 36 हजार 523 मतांवर समाधान मानावे लागले. आ. काळे हे राज्यात विक्रमी सव्वा लाखांच्या मतांच्या फरकाने निवडून आले. त्यांच्या मतांचे अंतर हे एक लाख 24 हजार 624 एवढे राहिले. महाराष्ट्रात कदाचित सर्वात जास्त मतांनी ते विजयी झाल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

काळे-कोल्हेंभोवतीच फिरतं राजकारण

कोपरगावचं राजकारण हे काले व कोल्हे या दोन्ही साखर सम्रांटाभोवतीच फिरतं असा इतिहास आहे. निवडणूक ग्रामपंचायतीची असो वा थेट विधानसभेची या दोन्ही नेत्यांमध्येच आत्तापर्यंत फाईट होत आली आहे. मात्र यावेळी सत्तेच्या सारीपाटावरील समि‍करणे बदलली. पहिल्यांदाच माजी आमदार स्नेहलता कोल्हे व युवा नेते विवेक कोल्हे हे विद्यमान आ. आशुतोष काळे यांचा प्रचार करताना दिसले. काळे व कोल्हे घराण्याच्या तिसऱ्या पिढीतील ही सहमती एक्सप्रेस, कोपरगावकरांसाठी एक सुखद धक्का देणारी ठरली. विरोधात शरद पवारांचे उमेदवार संदीप वर्पे अगदीच नवखे वाटले.

भाजपने दूर केली कोल्हेंची नाराजी

या मतदारसंघात युवा नेते विवेक कोल्हे यांना महायुतीकडून उमेदवारी मिळाली नाही. स्टॅन्डिंग आमदाराच्या फाँर्म्यूल्यामुळे ही जागा अजित पवार गटाला मिळाली. त्यानंतर कोल्हे शरद पवार गटात जातील अशा चर्चा रंगल्या. मात्र थेट आ. राधाकृष्ण विखे यांच्या मदतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या समोर कोल्हे यांची नाराजी दूर करण्यात भाजपला यश आले. त्यामुळे कोल्हेंनी शेवटपर्यंत आ.काळे यांना साथ दिली. त्यामुळेच काळे यांचा विजय सोप्पा झाला व ते विक्रमी मतांनी विजयी झाले, असे सांगितले जात आहे.

कोल्हेंची भूमिका महत्त्वाची

काळे-कोल्हे एकत्र आल्याने कोपरगावातील निवडणूक ही एकतर्फी झाली. सहकारातील दोन्ही नेते एकत्र आल्याने आ. आशुतोष काळे यांचा विजय सोप्पा झाला. कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव गट, शिंगणापूर गट, करंजी बुद्रुक गट, संवत्सर गट, पोहेगाव गट व चांदेकसारे गट या सगळ्याच गटांत आता आ. काळेंना विक्रमी मतदान झाले. शिवाय कोपरगाव मतदारसंघात काळे व कोल्हेंशिवाय राधाकृष्ण विखे यांचे मेहूणे राजेश परजणे यांचीही साथ मिळाली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+