अजेंडा एकच; 'मॅन टू मॅन आणि हार्ट टू हार्ट' संपर्क!
लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळालेले नाही. मात्र तरीही महायुतीचे नेते नव्या अनुभावानिशी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात ठाण मांडले असून ते विविध विभागांच्या बैठका घेत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने पायाला भिंगरी लावली आहे. लोकसभा निवडणुकीत सेट करण्यात आलेला नेरेटिव्हचा चक्रव्यूह कसा भेदायचा याचे प्रशिक्षणच शिंदे आणि फडणवीस यांच्याकडून आपल्या पदाधिकार्यांना देण्यात येत आहे.
कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2024 चे महायुती उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचारार्थ तीन हात नाका, ठाणे येथे आयोजित महायुती विजय संकल्प मेळाव्यास उपस्थित राहून जमलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनसमुदायास संबोधित केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी यांच्या समवेत त्यांनी निरंजन यांच्या व्हिजन डॉक्युमेंटचे प्रकाशन केले.
९९ हजार मतदार ठाणे जिल्ह्यातील
निरंजन डावखरे यांच्यासारखा तरुण, तडफदार उमेदवार महायुतीला मिळाला आहे. गेली १२ वर्ष निरंजन यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करून आपल्या सुस्वभावाने आणि सक्रिय सहभागाने सर्वांची मने जिंकली. कोकण पदवीधर मतदारसंघ हा सर्वात मोठा मतदारसंघ आहे. यामध्ये विधानसभेचे ३९ मतदारसंघ समाविष्ट आहेत. या मतदारसंघात २,२५,००० मतदारांचे रजिस्ट्रेशन झाले असून यातील जवळपास ९९,००० मतदार हे केवळ ठाणे जिल्ह्यातील आहेत. तर उर्वरित जवळपास १,५०,००० मतदार हे कोकणातील अन्य जिल्ह्यातील आहेत, असे फडणवीस म्हणाले.
नवीन 'नॅरेटिव्ह' निर्माण करणारी निवडणूक
ही निवडणूक 'मॅन टू मॅन आणि हार्ट टू हार्ट' अशा प्रकारच्या प्रचारातून आपल्याला लढवायची आहे. 'फेक नॅरेटिव्ह' दूर करून महाराष्ट्रात नवीन 'नॅरेटिव्ह' निर्माण करण्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. लोकसभेच्या निवडणुकीत ठाणे आणि कोकण विभागात प्रचंड यश प्राप्त झाले. काही लोकांनी अशी गर्जना केली होती कि, आम्ही महायुतीला तडीपार करु, परंतु कोकणने त्यांना कोकणातूनच तडीपार केले. पुन्हा एकदा कोकणचा आशीर्वाद या निवडणुकीत महायुतीलाच मिळेल असा मला विश्वास आहे, असे फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितले.
या मेळाव्यास मंत्री रवींद्र चव्हाण, खा. डॉ. श्रीकांत शिंदे, खा. नरेश म्हस्के, आ. गणेशजी नाईक, आ. मंदाताई म्हात्रे, कपिल पाटील जी व इतर मान्यवर उपस्थित होते. कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे निरंजन डावखरे आणि कॉंग्रेसचे रमेश कीर यांच्यात लढत होत आहेत. मनसेचे अभिजित पानसे यांनी या लढतीतून माघार घेतली आहे.












Click it and Unblock the Notifications