Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

राजकारणातून निवृत्ती तरीही आमदाराला संधी, बारामतीत पवार Vs पवार युद्ध?, 6 मुद्द्यात वाचा- NCPची यादी

महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजताच आता विविध पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर केल्या जात आहेत. महायुतीतील भाजप, शिवसेने नंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने देखील आज 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा समावेश आहे.

यामध्ये धनंजय मुंडे यांना परळीतून, दिलीप वळसे पाटील यांना आंबेगावमधून, आशुतोष काळे यांना कोपरगावमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर स्वत: अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातून मैदानात उतरले आहेत. चला तर 6 मुद्द्यात जाणून घेऊया अजित पवार यांनी जाहीर केलेल्या यादीविषयी. नेमकी कोणाला कुठून मिळाली संधी, मतदारसंघात नेमका कोणाचा कोणासमोर असणार सामना.

Ajit Pawar

1) निवृत्तीची घोषणा अन् दादांनी दिले पुन्हा तिकीट

बीड जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये, परळी मतदारसंघातून धनंजय मुंडेंची उमेदवारी जाहीर झाली आहे, तर माजलगाव मतदारसंघातून विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांना तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे, राजकारणातून निवृत्ती घोषित केलेल्या नेत्यालाही अजित पवारांनी अस्तित्वाची ठरत असलेल्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे.

बीडमधील माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली होती. त्याचवेळी त्यांनी यंदाची विधानसभा लढवणार नसल्याची घोषणा केली. तसेच, आपले राजकीय वारसदार म्हणून त्यांचा पुतण्या जयसिंह सोळंके यांच्या नावाची घोषणा देखील त्यांनी केली होती. परंतु, अजित दादांनी जयसिंह सोळंके यांना उमेदवारी न देता प्रकाश सोळंके यांनाच तिकीट दिले.

2) सुनील टिंगरे, नवाव मलिक यांचे टेन्शन वाढलं

राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर अजित पवारांची साथ देणाऱ्या अनेक बड्या नेत्यांचा समावेश नाही. पहिल्या यादीत नाव नसल्यामुळे अजितदादा गटातील आमदार सुनील टिंगरे व नवाब मलित यांचा समावेश नाही. त्यामुळे त्यांची धाकधूक वाढलेली आहे.

सुनील टिंगरे पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघातील आमदार आहेत. अशातच वडगाव शेरी मतदारसंघातून लढण्यासाठी भाजपचे जगदीश मुळीक हे देखील इच्छूक आहेत. त्यामुळे वडगाव शेरीची जागा भाजप आणि अजितदादा गटापैकी कोणाच्या वाट्याला जाणार याचा निर्णय झालेला नसल्याचे दिसून येत आहे.

3) बारामतीत युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार लढाई

लोकसभेनंतर आता विधानसभेला देखील बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार अशीच लढत होईल, अशी चिन्हे आहेत. सुप्रिया सुळे यांनी त्याबाबत संकेत दिल्याच्या चर्चा होत्या. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या उमेदवारी बद्दलची संदिग्धता आता संपली आहे. 28 तारखेला बारामती मधून उमेदवारी भरणार आहेत. तर दुसरीकडे त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार हेच विरोधातील उमेदवार असतील अशा चर्चा आहेत. बारामती मतदारसंघात अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार हेच निवडणूक लढवतील, अशी चर्चा आहे.

4) मुंबईतील एकाही उमेदवाराचा समावेश नाही

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीत नवाब मलिक आणि सना मलिक यांच्या नावाचा समावेश नाही. किंबहुना अजितदादा गटाच्या पहिल्या उमेदवारी यादीत मुंबईतील एकाही जागेचा समावेश नाही. केवळ ठाणे जिल्ह्यातील कळवा-मुंब्रा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात नजीब मुल्ला यांच्या उमेदवारीची घोषणा अजित पवार यांच्यावतीने करण्यात आली.

5) इंदापूरात रंगणार पाटील विरुद्ध भरणे मामा

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने आज जाहीर केलेल्या यादीत बहुतांश विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये राज्यात चर्चेत असणाऱ्या इंदापूर विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटाने विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांना संधी दिली आहे. त्यामुळं इंदापूरमध्ये तिसऱ्यांदा हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्तामामा भरणे असा समान रंगणार आहे.

6) काल प्रवेश आज उमेदवारी जाहीर

राजकुमार बडोले यांनी कालच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश झाला. तर आज जाहीर झालेल्या यादीत त्यांच्या उमेदवारीची घोषणा झाली. राजेश विटेकर यांच्या आई निर्मला विटेकर यांना उमेदवारी देण्यात आली. अशाप्रकारे अजित पवार यांच्या पहिल्या यादीतील महत्त्वाचे मुद्दे दिसून येत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यादी
विधानसभा मतदारसंघ अन् उमेदवारांची नावं

बारामती- अजित पवार
येवला- छगन भुजबळ
आंबेगाव- दिलीप वळसे पाटील
कागल- हसन मुश्रीफ
परळी- धनंजय मुंडे
दिंडोरी- नरहरी झिरवाळ
अहेरी- धर्मरावर बाबा अत्राम
श्रीवर्धन- आदिती तटकरे
अंमळनेर- अनिल भाईदास पाटील
उदगीर- संजय बनसोडे
अर्जुनी मोरगाव- राजकुमार बडोले
माजलगाव- प्रकाश दादा सोळंके
वाई- मकरंद पाटील
सिन्नर- माणिकराव कोकाटे
खेड आळंदी - दिलीप मोहिते पाटील
अहमदनगर शहर- संग्राम जगताप
इंदापूर- दत्तात्रय भरणे
अहमदपूर- बाबासाहेब पाटील
शहापूर- दौलत दरोडा
पिंपरी- अण्णा बनसोडे
कळवण- नितीन पवार
कोपरगाव- आशुतोष काळे
अकोले - किरण लहामटे
वसमत- चंद्रकांत उर्फ राजू नवघरे
चिपळूण- शेखर निकम
मावळ- सुनील शेळके
जुन्नर- अतुल बेनके
मोहोळ- यशवंत माने
हडपसर- चेतन तुपे
देवळाली- सरोज आहिरे
चंदगड - राजेश पाटील
इगतुरी- हिरामण खोसकर
तुमसर- राजे कारमोरे
पुसद -इंद्रनील नाईक
अमरावती शहर- सुलभा खोडके
नवापूर- भरत गावित
पाथरी- निर्णला विटेकर
मुंब्रा-कळवा- नजीब मुल्ला

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+