"सुनेला वाचवण्यासाठी भाजप स्तुती!; महेश कोठारे यांच्या मोदी भक्तीवर या अभिनेत्रीचा गंभीर आरोप!
Kishori Pednekar Accuses Mahesh Kothare : ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी नुकताच भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'भक्त' असल्याचे वक्तव्य केल्यानंतर मराठी सिनेसृष्टीसह राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
यावरून त्यांना ठाकरे गटाकडून लक्ष्य केले जात असतानाच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे.
कोठारे यांनी आपल्या सुनेला (उर्मिला कोठारे) एका अपघात प्रकरणातून वाचवण्यासाठीच भाजपची स्तुती केल्याचा दावा पेडणेकर यांनी केला आहे.

किशोरी पेडणेकर यांचा थेट आरोप
महेश कोठारे यांच्यावर निशाणा साधताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, महेश कोठारे एक मोठे कलाकार आहेत, यात शंका नाही, पण त्यांच्या सूनबाई उर्मिला कोठारे एका अपघात प्रकरणात अडकल्या आहेत. "तिला त्या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठीच महेश कोठारे यांनी भाजपची स्तुती केली आहे," असा थेट दावा त्यांनी केला.
पेडणेकर पुढे म्हणाल्या, उर्मिला कोठारेला कसे वाचवायचे हा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. भाजपवर अशी मुक्ताफळे उधळल्याशिवाय ही गोष्ट साध्य होणार नाही हे त्यांना ठाऊक आहे." त्यांनी महाराष्ट्रात एक वेगळीच संस्कृती तयार होत असल्याचा आरोप करत अप्रत्यक्षपणे या प्रकारावर टीका केली.
काय आहे उर्मिला कोठारे अपघात प्रकरण?
अभिनेत्री उर्मिला कोठारे (Urmila Kothare) यांच्या कारचा अपघात गतवर्षी डिसेंबर महिन्यात झाला होता. या भीषण अपघातात एका मजुराचा मृत्यू झाला होता.
वेळ आणि ठिकाण
गत डिसेंबर महिन्यात मध्यरात्री १२:५४ च्या सुमारास ठाणे ते घोडबंदर रस्त्यावर हा अपघात घडला होता.
अपघाताची माहिती
उर्मिला कोठारे या आपल्या मैत्रिणीला भेटून तिच्या घरी जात असताना ही घटना घडली. त्यांचा चालक गजानन पाल हा कार चालवत होता. कांदिवाली पोईसर मेट्रो स्थानकालगत चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार उलटली.
मृत्यू आणि जखमी
कार पलटी होण्यापूर्वी तिने मेट्रो स्थानकालगत काम करणाऱ्या दोन मजुरांना उडवले होते. त्यापैकी सम्राटदास जितेंद्र नामक मजूराचा मृत्यू झाला. या अपघातात उर्मिला कोठारेही जखमी झाल्या होत्या आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून कार चालकाच्या रक्ताचे नमुने घेतले होते. मात्र, चालकाने मद्यपान केले होते की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही आणि या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून अद्याप सुरू आहे.
महेश कोठारे यांचे वादग्रस्त वक्तव्य?
किशोरी पेडणेकर यांनी आरोप करण्यापूर्वी महेश कोठारे हे त्यांच्या भाजप स्तुतीमुळेच ठाकरे गटाच्या रडारवर आले होते. मागाठाणे येथील दिवाळी पहाट कार्यक्रमात बोलताना त्यांनी केलेले वक्तव्य केले. "मी मोदी भक्त आहे, भाजपचा भक्त आहे." "भाजप म्हणजे आपले घर आहे. यावेळचा महापौरही येथूनच (भाजपमधून) निवडून गेलेला असेल. मुंबईत नक्कीच कमळ फुलेल."
महेश कोठारे यांच्या या विधानांवरून खासदार संजय राऊत यांनी त्यांना "तात्या विंचू रात्री तुमचा गळा आवळेल," असा टोला लगावला होता. मात्र, महेश कोठारे यांनी आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचे सांगून राजकीय चर्चांना अधिक हवा दिली आहे.












Click it and Unblock the Notifications