Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

KEMरुग्णालयाला 100 वर्ष पू्र्ण! अरुणा शानबाग प्रकरण ते पहिली हॉर्ट सर्जरी वाचा DCM शिंदे काय म्हणाले

KEM Hospital Centenary : मुंबईकरांचा श्वास जिवंत ठेवणाऱ्या केईएम रुग्णालयाला शंभर वर्ष पूर्ण झाली आहे. हे तेच रुग्णालय आहे जिथे अरुणा शानबाग यांची 41 वर्ष सेवा येथील कर्मचाऱ्यांनी आणि डाॅक्टरांनी केली. यासह देशातील पहिली हॉर्ट सर्जरी येथेच झाली या रुग्णालयाचा शंभर वर्षांचा इतिहास आहे. यानिमित्त आयोदित कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या आठवणी जागवल्या.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात काही सूचना केल्या. "रुग्णसेवेच अखंड व्रत घेतलेले केईएम रुग्णालय हे मुंबईकरांचे खऱ्या अर्थाने आधारवड आहे. ज्या विश्वासाने रुग्ण येथे येतात त्यांना जागा कमी पडू नये यासाठी केईएम मध्ये आयुष्मान शताब्दी टॉवर उभे करावे," असे निर्देश शिंदे यांनी आज दिले.

KEM Hospital Centenary

सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय आणि केईएम रुग्णालयाच्या 99 वा वर्धापन दिन सोहळा रुग्णालयाच्या प्रांगणात झाला. त्यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

KEM रुग्णालयाच्या चरणी मी नतमस्तक

अविरत रुग्णसेवेची शंभर वर्ष पूर्ण करणाऱ्या आणि लाखो रुग्णांना जीवनदान देणाऱ्या केईएम रुग्णालयाच्या चरणी मी नतमस्तक होतो, अशी भावना उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी आज केईएम रुग्णालयाच्या शतक महोत्सवी समारंभात व्यक्त केली. उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, केईएमने घेतलेलं रुग्णसेवेचं व्रत अवघड आहे. आजही इथली रुग्णसेवा अहोरात्र चालू आहे. इथल्या डॉक्टरांचे, नर्सेसचे, कर्मचाऱ्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. तुम्ही आहात, म्हणून सामान्य मुंबईकर आज जगतो आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले.

एकनाथ शिंदे म्हणाले, "सेवाभाव हा परमभाव आहे, असे आपली संस्कृती सांगते. डॉक्टर देखील वैद्यकीय क्षेत्रात येताना सेवाधर्माची शपथ घेतात. ही शपथ घेऊनच 99 वर्षांपूर्वी हे हॉस्पिटल उभं राहिलं. आजही मुंबई आणि आसपासच्या रहिवाश्यांना आधार देत उभं आहे."

KEM देशातील सर्वोत्तम रुग्णालय - शिंदे

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, घरातल्या आधारवडासारख्या बुजुर्ग व्यक्तीबद्दल आपल्याला आदरभाव असतो. आपुलकी असते, तशीच भावना केईएम बद्दल आहे. एखाद्या आरोग्य क्षेत्रातील संस्थेनं सुवर्ण किंवा शताब्दी महोत्सव साजरा करणं ही त्या संस्थेसाठी अभिमानास्पद बाब असते. आज केईएम रुग्णालय हे देशातील सर्वोत्तम रुग्णालयांपैकी एक आहे. केईएम हे कुटुंब आहे. त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीची काळजी घेतली जाते. सांस्कृतिक वारसा जपत अत्याधुनिकतेची कासही केईएमने धरली. आरोग्य क्षेत्राच्या नव्या दिशा आणि आंतरराष्ट्रीय मानके केईएमने स्थापित केली असल्याचे त्यांनी सांगितले.

केईएम सारखी रुग्णालये ही सर्वसमान्यांसाठी देवदूतासारखी आहेत. अरुणा शानबाग यांची 41 वर्षे सेवा केईएमच्या कर्मचाऱ्यांनी केली.जगातल्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवेचं असं उदाहरण नसेल. केइएमसोबत नाव येतं ते जीएस वैद्यकीय महाविद्यालयाच. कितीतरी नामवंत, दिग्गज डॉक्टर या कॉलेजच्या प्रांगणात तयार झाले. इथल्या डॉक्टरांची संशोधकांची कीर्ती जगभर पसरलेली असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हटले.

..ही आहे केईएमची खासीयत

भारतातील पहिली हृदय शस्त्रक्रिया केईएम रुग्णालयात 1968 मध्ये झाली. त्यानंतर 2024 रोजी यशस्वी हार्ट ट्रान्सप्लाँट येथे करण्यात आले. अवयवदानामध्ये वाखाणण्यासारखे कार्य केल्याबद्दल केईएम रुग्णालयाचा काही दिवसांपूर्वीच दिल्लीत गौरव करण्यात आला. भारतातील पहिली टेस्ट ट्युब बेबीही केईएम रुग्णालयात 1987 साली डॉ. इंदिरा हिंदुजा यांनी घडवली आणि आता इथे रोबोट या अत्याधुनिक तंत्रज्ञानामार्फत गुडघ्याच्या सांधेबद्दल शस्त्रक्रिया करण्यात येतात. वैद्यकीय क्षेत्रात केईएमने केलेली ही क्रांती ऐतिहासिक असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांचे निर्देश

रुग्णालयात झिरो प्रिस्किप्शन पॉलिसी लागू करावी त्याचबरोबर रुग्णांना जागा कमी पडू नये यासाठी शताब्दी महोत्सवी वर्षात आयुष्मान टॉवर उभे करतानाच रुग्णाच्या नातेवाईकांची परवड होवू नये यासाठी व्यवस्था निर्माण करण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. याठिकाणी डॉक्टरांचे म्युझियम करण्यात यावे अशी सूचनाही त्यांनी केली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+