Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Helicopter Crash: केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत यवतमाळच्या जयस्वाल कुटुंबातील तिघांचा मृत्यू!

kedarnath helicopter crash Maharashtra Connection : उत्तराखंडच्या केदारनाथमध्ये रविवारी पहाटे भाविकांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळलं. या दुर्घटनेमध्ये पायलटसह 7 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महाराष्ट्रातील एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश होता. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील एकाच कुटुंबातील पती-पत्नी व त्यांची दोन वर्षांची मुलीचा यामध्ये मृत्यू झाला.

यवतमाळ जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे राहणाऱ्या जयस्वाल कुटुंबाचा मृत्यू झाला. राजकुमार जयस्वाल, श्रद्धा जयस्वाल, काशी राजकुमार जयस्वाल अशी या मृतांची नावं आहेत.

देवदर्शनापूर्वीच काळाचा घाला

राजकुमार जयस्वाल हे पत्नी श्रद्धा आणि मुलगी काशीसोबत 12 जून रोजी वणी इथून केदारनाथसाठी गेले होते. पण देवदर्शन करण्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातला आणि अख्ख्या कुटुंबाचा हेलिकॉप्टर अपघातामध्ये मृत्यू झाला.

kedarnath helicopter crash update

नेमकी कशी घडली घटना, या कंपनीचे होते हेलिकॉप्टर?

उत्तराखंडमधील केदारनाथ येथे रविवारी पहाटे भाविकांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर कोसळलं. केदारनाथ मार्गावर हे हेलिकॉप्टर कोसळले. या हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह 7 जण होते.

या सर्वांचा जागीच मृत्यू झाला. खराब हवामानामुळे गौरीकुंड आणि त्रिजुगीनारायण दरम्यान हेलिकॉप्टरला अपघात झाला. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर आर्यन कंपनीचे असल्याची माहिती समोर आली.

खराब हवामानामुळे अपघात घडल्याची माहिती?

UCADA ने एक प्रेस रिलीज जारी केली आहे. ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, रविवारी पहाटे 5.17 वाजता आर्यन कंपनीचे हेलिकॉप्टर केदारनाथ हेलिपॅडवरून गुप्तकाशी हेलिपॅडकडे भाविकांना घेऊन निघाले होते.

वाटेत खराब हवामानामुळे हे हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेनंतर घटनास्थळावर बचाव पथक दाखल झाले. सर्वांचे मृतदेह शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अपघातानंतर हेलिकॉप्टरचे तुकडे-तुकडे झाले होते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+