Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'धनंजय मुंडेंना ही दलाल टीम मुली अन् दारु पुरवतात', करुणा शर्मांनी थेट नावचं सांगितली अन् खळबळ..

Dhananjay Munde : मला प्रेमात अकडवून लग्न करणाऱ्याला 20 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आलेली होती, असा धक्कादायक आरोप करुणा मुंडे यांनी नुकताच केलाय. धनंजय मुंडे आणि त्यांचे दलाल लोक कुणालातरी राजी करण्यासाठी दलाली करीत होते, असं म्हणत करुणा मुंडेंनी त्या लोकांची थेट नावचं सांगितली आहेत.

काय म्हणाल्या करुणा शर्मा-मुंडे?

करुणा शर्मा-मुंडे यांनी काल कोर्टाच्या निकालानंतर माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप केले. त्या म्हणाल्या की, राज घनवट, पुरुषोत्तम केंद्रे, तेजस ठक्कर हे धनंजय मुंडेंसाठी दलाली करतात. मला प्रेमात अडकवून लग्न करणाऱ्याला 20 कोटी रुपये हेच लोक देणार होते. ही दलाल टीम धनंजय मुंडेंना मुली पुरवतात आणि दारुही पुरवतात.

Karuna Sharma Vs Dhananjay Munde

या दलालांमुळे मुंडेंची ही अवस्था झालीय

करुणा मुंडे पुढे म्हणाल्या की, घनवट, ठक्कर आणि केंद्रे या दलालांमुळे धनंजय मुंडेंवर घरात बसण्याची वेळ आलेली आहे. २७ वर्षे मी धनंजय मुंडेचा मुलासारखा सांभाळ केला, पतीसारखं नाही मुलासारखं सांभाळलं आहे. आज त्यानेच मला रस्त्यावर आणलं. आज केवळ मी त्याची गाडी आणली तर गदारोळ केला.

Take a Poll

धनंजय मुंडेंची मीच पहिली पत्नी

धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आपणच आहोत, हे सिद्ध करण्यासाठी करुणा मुंडेंची न्यायालयीन लढाई सुरु आहे. धनंजय मुंडे मात्र त्यांना पत्नी मानायला तयार नाहीत. आम्ही लिव्ह-इन-रिलेशनशीपमध्ये होतो, असा दावा ते करतात. तर करुणा मुंडे पत्नी असल्याचे पुरावे आहेत, असं सांगतात.

दोन लाखांची पोटगी देण्याचे आदेश

वांद्रे कोर्टाने धनंजय मुंडे यांना दोषी ठरवत करुणा मुंडेंना दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले होते. त्या निर्णयाविरोधात मुंडेंनी वरच्या कोर्टात धाव घेतली आहे. तर करुणा मुंडे ९ लाख रुपये पोटगीसाठी आग्रही आहेत. धनंजय मुंडेंना करुणा मुंडेंपासून झालेली दोन मुलं मान्य आहेत, परंतु पत्नी मान्य नाही, असा हा लढा आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+