कर्जत-जामखेड विधानसभा : रोहित पवार विरुद्ध राम शिंदे - प्रतिष्ठेची लढत, कोण जिंकणार? वाचा रिपोर्ट
Karjat Jamkhed Assembly Election 2024 : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील 2024 च्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. रोहित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष) आणि भाजपचे राम शिंदे यांच्यात रंगणारी ही लढत अत्यंत चुरशीची ठरणार आहे. या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना पाहायला मिळणार आहे.
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ हा नगर जिल्ह्यातील महत्त्वाचा मतदारसंघ आहे. 1995 पासून भाजपचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात 2019 मध्ये रोहित पवार यांनी विजय मिळवत नवा इतिहास घडवला. 25 वर्षांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसला या मतदारसंघात स्थान मिळाले.

भाजपचे आव्हान
राम शिंदे यांना पुन्हा उमेदवारी देऊन भाजपने कर्जत-जामखेडचा गड परत मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवलं आहे. मात्र, रोहित पवार यांच्या विरोधात प्रभावी रणनीती आखावी लागणार आहे. कर्जत-जामखेडमधील निवडणूक ही केवळ स्थानिक लढत नसून शरद पवार आणि अजित पवार यांच्या वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्यावरही परिणाम करणारी ठरेल. भाजपसाठी हा मतदारसंघ परत जिंकणे प्रतिष्ठेचे आहे, तर रोहित पवार यांना आपला किल्ला राखण्यासाठी स्थानिक आणि राज्यस्तरीय राजकीय आव्हानांचा सामना करावा लागेल.
2024 निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे
1. काँग्रेस, ठाकरे गटाची साथ : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पवार पक्षाचे रोहित पवार यांना कॉंग्रेस आणि ठाकरे गटाची साथ आहे.
2. अजित पवार गटाचा प्रभाव : अजित पवार गट रोहित पवार यांना लक्ष्य करण्यासाठी महायुतीसोबत आहे, ज्यामुळे भाजपला बळत आहे.
3. स्थानिक विकासाचे प्रश्न : बेरोजगारी, पाणीटंचाई, आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यावर दोन्ही पक्ष प्रचार केंद्रित करतील.
4. लोकसभा निकालाचा प्रभाव : कर्जत-जामखेडमधून निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने मोठे मताधिक्य मिळवले होते, ज्याचा आत्मविश्वास रोहित पवारांना असेल.
आतापर्यंत काय झाले?
1995-2014 : भाजपचे सदाशिव लोखंडे आणि राम शिंदे यांनी सातत्याने विजय मिळवला.
2019 : रोहित पवार यांनी 43,347 मतांनी राम शिंदे यांचा पराभव केला.
2019 विधानसभा निकाल
रोहित पवार (राष्ट्रवादी) : 1,35,824 मते
राम शिंदे (भाजप) : 92,477 मते

लोकसभा 2024 निकाल (कर्जत-जामखेड)
महाविकास आघाडी (नीलेश लंके) : 1,04,953 मते
महायुती (सुजय विखे-पाटील) : 95,835 मते












Click it and Unblock the Notifications