परळीत 201 बूथ ताब्यात घेऊन मतदान! मतदाराच्या बोटाला शाई, गँग करायची वोटींग!- जितेंद्र आव्हाडाचा आरोप
Jitendra Awhad's allegations : परळी मतदार संघात 201 बूथ ताब्यात घेऊन मतदान करण्यात आले शाई लावायची आणि बाहेर जायचे मतदान केंद्राच्या आत मध्ये तुमचे बटन दाबण्याचे काम ही गँग करायची असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला. या आरोपीची चर्चा आता होत आहे.
परळी हा धनंजय मुंडे यांचा मतदारसंघ आहे. ते या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. सध्या धनंजय मुंडेंना संतोष देशमुख हत्या प्रकरणातील खंडणीच्या आरोपाखाली अटक असलेल्या वाल्मिक कराडशी संबंध असल्यावरुन विरोधकांनी घेरले आहे. विरोधक एकीकडे धनंजय मुंडेंना लक्ष्य करत असताना जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मिडिया अकाऊंट एक्सवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी परळीत 201 बुथ ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप केला.

काय आहे जितेंद्र आव्हाड यांची एक्स पोस्ट
"परळी मतदार संघात 201 बूथ ताब्यात घेऊन मतदान करण्यात आले शाई लावायची आणि बाहेर जायचे मतदान केंद्राच्या आत मध्ये तुमचे बटन दाबण्याचे काम ही गँग करायची. सगळे एकदम ट्रान्सपरंट पोलिसांसमोर, असे परळीचे उमेदवार राजाभाऊ देशमुख ह्यांनी सांगितले. व्हिडिओ आहेत काही ठिकाणचे, कोण काय करणार, हे कायद्याचे राज्य आहे, पुढे कुणाला काँट्रॅक्ट द्यायचे असेल तर वाल्मिक कराडशी संपर्क साधावा." अशी एक्सवर आव्हाड यांनी पोस्ट केली आहे."
परळी मतदार संघात २०१ बूथ ताब्यात घेऊन मतदान करण्यात आले शाई लावायची आणि बाहेर जायचे मतदान केंद्राच्या आत मध्ये तुमचे बटन दाबण्याचे काम ही गैंग करायची
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 10, 2025
सगळे एकदम ट्रांसपेरेंट पोलिसांसमोर
असे परळीचे उमेदवार राजाभाऊ देशमुख ह्यांनी सांगितले
वीडियो आहेत काही ठिकाणचे
कोण काय करणार… https://t.co/7BqoAUkXGw
गजाभाऊ नावाच्या एक्स हँडलवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. गोट्या गीते नावाचा इसम ईव्हीएम मशीनवरून धनंजय मुंडे यांना मतदान करताना दिसतोय. गजाभाऊने या व्हिडीओसह कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की "गोट्या गीतेचा अजून एक कारनामा, मतदान करतानाचा व्हिडिओ त्याने टाकलेला आहे. तुम्ही स्पष्ट बघू शकता की त्याच्याबरोबर अजून कोणीतरी बाजूला मतदान करत आहे. हे बूथ कॅप्चर नसेल का?"
सुरेश धस यांनी आकाची प्राँपर्टीच मांडली
संतोष धस प्रकरण उचलून धरणारे आमदार सुरेश धस यांनी आपल्या भाषणात आकाची प्राँपर्टीच जनतेसमोर मांडली. ते म्हणाले, मला बिल्डरकडून आकाच्या संपत्तीची माहिती मिळाली. पुण्याच्या एफसीरोडवर आकाने सात दुकानं बुक केली आहेत. ज्या एका दुकानाची किंमत पाच कोटी रुपये आहे. आका शंभर टक्के 302 चा आरोपी आहे. परळीत एका वर्षात तब्बल 109 मृतदेह सापडले आहेत. त्यातील अनेक मृतदेहाची ओळख पटलेली नाहीये. आकाने मोठ्या आकाला जर फोन केला असेल, तर मोठ्या आकाचाही नंबर पोलिस तपासात येईल. मात्र आकाची प्राँपर्टी पाहून आकाने संपत्तीच्या बाबतीत अंबानीलाही मागे टाकले असावे, असे मला वाटते.












Click it and Unblock the Notifications