Jijau Jayanti 2026 : स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ जन्मोत्सव विशेष खास 20 शुभेच्छा संदेश करा शेअर
Jijau Jayanti 2026 Wishes in marathi : ज्यांनी शिवबांसारखा महापराक्रमी पुत्र घडवला आणि शून्यातून स्वराज्य निर्माण करण्याची जिद्द दिली, त्या स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव १२ जानेवारी रोजी साजरा होत आहे. सिंदखेड राजाच्या मातीत जन्मलेल्या या कर्तृत्ववान माऊलीने केवळ एका साम्राज्यालाच नाही, तर एका संपूर्ण संस्कृतीला दिशा दिली. जिजाऊंचा जन्मदिवस म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि स्त्री-शक्तीच्या अथांग प्रेरणेचा उत्सव. या मंगल दिनी राजमाता जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी खास शुभेच्छा संदेश आणि त्यांचे प्रेरणादायी विचार...

जिजाऊ जन्मोत्सव शुभेच्छा संदेश (Wishes)
१. स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ साहेब यांच्या जन्मोत्सवानिमित्त त्रिवार अभिवादन!
२. अखंड महाराष्ट्राचे दैवत, जिजाऊ माऊलींच्या जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा!
३. संस्कारांचा हिमालय आणि स्वराज्याची प्रेरणा, राजमाता जिजाऊंना मानाचा मुजरा!
४. ज्यांनी घडवले शिवछत्रपती, त्या जिजाऊ माऊलींच्या चरणी नतमस्तक!
५. स्वराज्य निर्मितीचा पाया रचणाऱ्या आऊसाहेबांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
६. जिजाऊंच्या विचारांची मशाल आपल्या मनात सदैव तेवत ठेवून स्वराज्याची सेवा करूया.
७. साक्षात आदिशक्तीचे रूप, राजमाता जिजाऊ साहेब यांना जयंतीनिमित्त वंदन!
८. जिजाऊ तुम्ही नसता, तर दिसले नसते हे स्वराज्य... तुम्हाला कोटी कोटी प्रणाम!
९. स्त्री शक्तीचा आदर्श, राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
१०. जिजाऊ आऊसाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मातीला आणि त्यांना माझा मुजरा!
११. शिवबांची माता, स्वराज्याची विधाता... राजमाता जिजाऊंना मानाचा मुजरा!
१२. तुमच्या संस्कारांमुळेच आज आम्ही मानाने जगतोय, आई जिजाऊंना विनम्र अभिवादन!
१३. तेजस्वी सूर्य आणि शीतल चंद्र जसे आकाशात, तसेच जिजाऊंचे विचार आमच्या मनात!
१४. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा मानबिंदू, जिजाऊ माऊलींच्या जयंतीनिमित्त मंगलमय शुभेच्छा!
१५. पराक्रम आणि बुद्धिमत्तेचा संगम म्हणजे राजमाता जिजाऊ... अभिवादन!
१६. शिवरायांच्या यशाचे गुपित म्हणजे जिजाऊंचे संस्कार... जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
१७. अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणाऱ्या माँ जिजाऊंना त्रिवार मुजरा!
१८. जिजाऊंचे विचार हीच आपली खरी संपत्ती... जयंतीनिमित्त शुभेच्छा!
१९. रयतेची आई, जिजाऊ माऊली... तुम्हाला मानाचा मुजरा आणि शुभेच्छा!
२०. शिव-शंभूंच्या प्रेरणेला माझा मानाचा मुजरा... जय जिजाऊ, जय शिवराय!












Click it and Unblock the Notifications