'मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधात लढत नाही'; जयंत पाटलांचा गोपीचंद पडळकरांवर निशाणा, नेमका वाद काय?
Jayant Patil Targets Gopichand Padalkar : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते जयंत पाटील यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. गोपीचंद पडळकरांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना जयंत पाटील यांनी, "मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधात लढत नाही," असं म्हणत अप्रत्यक्षपणे पडळकरांवर निशाणा साधला.
एवढंच नाही तर, "ज्या मतदारसंघात मतचोरी झाली, तिथे राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणूक लढवा," असं आव्हानही त्यांनी पडळकरांना दिलं.

जयंत पाटलांचे पडळकरांना थेट आव्हान
जयंत पाटील यांनी 'मतचोरी'च्या मुद्द्यावरून पडळकर यांना घेरण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही दिवसांपासून पडळकर सातत्याने जयंत पाटील यांच्यावर टीका करत होते.
याच टीकेला उत्तर देताना पाटील यांनी नाव न घेता, "ज्या मतदारसंघात व्होट चोरी झाली, तिथं राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणूक लढवा," असं म्हटलं. या वक्तव्यातून त्यांनी जत विधानसभा मतदारसंघातील मतदानाबद्दल अप्रत्यक्षपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
पडळकरांच्या टीकेला सडेतोड उत्तर
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी नुकतंच जयंत पाटील यांच्यावर "जयंत पाटील झुकत नाही, थेट पालथाच पडतोय," अशी जहरी टीका केली होती.
या टीकेला उत्तर म्हणून जयंत पाटील यांनी हे वक्तव्य केलं. जयंत पाटील यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावर आता पुढचा एक महिनाभर चर्चा चालेल असंही जयंत पाटील म्हणाले.
नव्या वादाला तोंड फुटणार!
या राजकीय कुरघोडीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एका वादाची भर पडली आहे, आणि यातून आता नवा राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. त्याला आता पडळकर कसे उत्तर देतात हे देखील पाहणे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे.
कारण, पडळकर सातत्याने शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील ते अजित पवारांवर देखील टीका करत असतात. ते भाजप आमदार असले तरी ते फडणवीसांचे कट्टर समर्थक आहेत, त्यामुळे फडणवीसांवर कोणीही टीका केली तरी त्याला प्रत्युत्तर देण्याचे काम गोपिचंद पडळकर करत असतात.












Click it and Unblock the Notifications