Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

वादाशी नाते असणाऱ्या जयकुमार रावलांवर भाजपचा दुसऱ्यांदा विश्वास... पुन्हा घेतली मंत्रीपदाची शपथ

Jayakumar Rawal Biography : भाजपकडून जयकुमार रावल यांना दुसऱ्यांदा मंत्रीपद मिळणार आहे. धुळ्यात भाजपला जे अभूतपुर्व यश मिळाले, त्याचे किंगमेकर ठरले जयकुमार रावल. धुळ्यातील पाचही जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आणण्यात रावल यांनी सिंहाचा वाटा उचलला होता. त्यामुळेच भाजपने त्यांचा मंत्रीपद देऊन सन्मान केला आहे. जयकुमार रावले हे शिंदखेडा मतदारसंघातून सलग पाचव्यांदा निवडून आले आहेत.

विदेशात झाले आहे शिक्षण

धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे जयकुमार रावल यांचा जन्म 16 जानेवारी 1975 रोजी जन्म झाला. मुंबई, पुणे येथे त्यांनी बी.कॉम. पर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी युकेमध्ये जात एम्.बी.ए.पुर्ण केले. रावल यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी अपत्ये आहेत. शिंदखेडा मतदारसंघातून ते यावेळी सलग पाचव्यांदा निवडून आले आहेत. यु.के.मधील कार्डीफ युनिर्व्हसिटीमध्ये त्यांचे शिक्षण झाले असल्याने त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्या मतदारसंघासाठीही केला आहे.

Jayakumar Rawal Biography

घरातून मिळाला राजकीय वारसा

रावल यांचे आजोबा सहकारमहर्षी दादासाहेब रावल व काका वृक्षमित्र बापूसाहेब रावल हे देखील आमदार होते. याशिवाय त्यांना ऐतिहासिक वारसा देखील लाभला असून ते खान्देशातील राऊळ या संस्थानिक कुटुंबातून येतात. स्वोद्धारक विद्यार्थी संस्थेचे सचिव, राणीमाँसाहेब मनुबादेवी रावल सह. पतसंस्था लि. दोंडाईचाचे संस्थापक, चेअरमन, कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक, धुळे जिल्हा सहकारी बँक लिमिटेडचे संचालक आदी पदांवर ते कार्यरत आहेत.

नगरसेवक ते आमदार

रावल यांच्या राजकारणाची सुरुवात नगरसेवकपदापासून झाली. वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी ते दोंडाईचा नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. ते 2004 पासून ते आतापर्यंत विधानसभेचे सदस्य आहेत. भाजपने त्यांच्यावर अनेकदा मोठमोठ्या जबाबदाऱ्या दिल्या. त्या त्यांनी लिलया पार पाडल्या आहेत. ते पंचायत राज समिती, अंदाज समिती, सार्वजनिक उपक्रम समिती व क्रीडा धोरण समितीचे सदस्य होते. जून 2015 मध्ये ते रोजगार हमी योजना समितीचे समिती प्रमुख होते. यापूर्वी देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन, पर्यटन, राजशिष्टाचार व रोजगार हमी योजना अशी महत्त्वपूर्ण खात्यांचे कॅबिनेट मंत्रीपद होते.

वादासोबतही जोडले नाते

रावल हे विविध गुन्ह्यांमुळेही नेहमी वादात राहिले आहेत. त्यांच्यावर वकिलावर प्राणघातक हल्ला, जमाव जमवून दंगल घडविण्याचा प्रयत्न, खुनाचा प्रयत्न, नगरसेविकेचे अपहरण, बँकेच्या कर्जवाटपात अफरातफर, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आठ ते दहा गुन्हे दाखल आहेत. दोंडाईचा पोलीस ठाण्यातही त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. 2013 मध्ये विधिमंडळात पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकणी त्यांना निलंबित करण्यात आले होतं. वाद आणि रावल यांचे पूर्वीपासून नाते आहे. आता ते दुसऱ्यांदा मंत्रीपदाची संधी स्विकारणार आहेत.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+